You are currently viewing चिवला समुद्र किनारी मच्छीमारांच्या रापण मासेमारी जाळीत सापडले ‘डॉल्फिन

चिवला समुद्र किनारी मच्छीमारांच्या रापण मासेमारी जाळीत सापडले ‘डॉल्फिन

मालवण

मालवण चिवला बीच समुद्र सफारी व डॉल्फिन दर्शनासाठी प्रसिद्ध आहे. शुक्रवारी सकाळी या ठिकाणी पारंपरिक मच्छिमारांनी लावलेल्या रापण मासेमारी जाळीत चक्क डॉल्फिन मासे सापडले. जवळपास १५ हून अधिक डॉल्फिन मासे रापणीच्या जाळ्यात अडकल्याचे मच्छिमारांच्या निदर्शनास आल्यानंतर या सर्व डॉल्फिनना पुन्हा समुद्रात सोडून देण्यात आले. दरम्यान डॉल्फिन पाहण्यासाठी पर्यटकांनीही गर्दी केली होती.

शुक्रवारी पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास रेवतळे येथील न्यू रापण संघाने नेहमीप्रमाणे या ठिकाणी रापणीची जाळी ओढली होती. यानंतर सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास रापण संघातील मच्छिमारांनी ही जाळी ओढली असता जाळ्यात सुमारे १५ हून अधिक डॉल्फिन मासे अडकून असल्याचे निदर्शनास आले. हे पाहताच मच्छिमारांनी या डॉल्फिनना तात्काळ समुद्रात सोडले.

डॉल्फिनना जवळून पाहण्यासाठी व पकडण्यासाठी पर्यटकांनीही मोठी गर्दी केली होती. मच्छीमार बांधव सुभाष मिठबावकर, जॅकी गिरकर, विजय फाटक, ईनास डिसोजा, अमय मांजरेकर, मंगेश वेंगुर्लेकर, अशोक पेडणेकर, महेश हडकर, बाबू मेंडीस, कर्नल फर्नांडिस, बाबत डिसोझा, जोसेफ फर्नांडिस यांनी डॉल्फिनना पुन्हा समुद्रात सोडले.

प्रतिक्रिया व्यक्त करा