You are currently viewing डेगवे गावच्या श्री माऊलीचा

डेगवे गावच्या श्री माऊलीचा

वार्षिक जत्रोत्सव १६ डिसेंबरला…!

बांदा

सावंतवाडी तालुक्यातील डेगवे गावच्या श्री.माऊली पंचायतन देवतांची वार्षिक जत्रोत्सव मार्गशीर्ष शु।२, बुधवार दिनांक १६ डिसेंबर २०२० रोजी आहे.
करोना महामारीच्या पार्श्वभूमीवर शासन, प्रशासन व ग्रामपंचायतीच्या मार्गदर्शनाखाली व माऊली देवस्थानच्या कार्यपध्दती नुसार श्री माऊलीची ओटी भरणे,नवस फेडणे,देवीचे दर्शन घेणे,पालखी काढणे,रात्री दशावतारी मंडळीचा नाट्यप्रयोग सादर करणे इत्यादी कार्यक्रम होणार आहेत. तरी भाविकानी ठरविक समांतर अंतर ठेवून रागेंत देवीचे दर्शन घ्यावे.असे आवाहन करण्यात आले आहे.
जत्रेच्या दिवशी सकाळी प्रतिवर्षी प्रमाणे”श्री स्थापेश्वर, महालक्ष्मी दिनदर्शिका २०२१” चे प्रकाशित करण्यात येणार आहे. तरी भाविकांनी सहकार्य करावे हि विनंती आहे.

उल्हास देसाई,

सरचिटणीस, डेगवे ग्रामस्थ हितवर्धक संघ,मुंबई.

प्रतिक्रिया व्यक्त करा

thirteen − thirteen =