You are currently viewing ११ सप्टेंबर पर्यत सिंधुदुर्ग किनारपट्टीवर वादळी वारे

११ सप्टेंबर पर्यत सिंधुदुर्ग किनारपट्टीवर वादळी वारे

मत्स्य विभागाचे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मच्छीमारांना खबरदारीचे आवाहन..

 

सिंधुदुर्ग :

 

राज्याच्या किनाऱ्यालगत असलेल्या मच्छीमारांना प्रादेशिक हवामान विभाग यांनी सतर्कतेचा व समुद्रात न जाण्याचा इशारा दिला आहे. याबाबत माहिती बुधवारी सिंधुदुर्ग मत्स्य विभागास प्राप्त झाली आहे. त्यानुसार मत्स्य विभागाने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मच्छीमारांना खबरदारीचे आवाहन केले आहे.

११ सप्टेंबर पर्यत सिंधुदुर्ग किनारपट्टीवर वादळी वारे वाहणार असून वाऱ्यांचा वेग ६५ किलोमीटर प्रतितास पोहचण्याची शक्यता आहे. तरी मच्छीमारांनी मासेमारीसाठी समुद्रात अथवा खाडी क्षेत्रात जाऊ नये. नौका, जाळी व मासेमारी सामग्री सुरक्षित ठेवावी. असे आवाहन सहायक आयुक्त मत्स्यव्यवसाय सिंधुदुर्ग, मालवण यांनी मच्छीमाराना बुधवारी केले आहे.

समुद्रात एकूणच वादळ सदृश्य स्थिती निर्माण झाली आहे. मच्छीमारांनी आपल्या नौका सुरक्षित स्थळी नेण्यास सुरवात केली आहे. तर गेले दोन दिवस जिल्ह्याच्या अनेक भागात गडगडटासह पाऊसही पडत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

thirteen − 11 =