कणकवली :
अतिरेकी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानला ‘जशास तसे’ उत्तर दिले. याच अनुषंगाने कणकवली शहरात शुक्रवार १६ मे रोजी सायंकाळी ४.३० वाजतां तिरंगा यात्रा काढण्यात येणार आहे. तर याचवेळी भाजपच्या जिल्हाध्यक्षपदी फेरनिवड झाल्याबद्दल प्रभाकर सावंत यांचाही सत्कार करण्यात येणार आहे. तिरंगा यात्रा ही पालकमंत्री नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली निघणार आहे. यात्रा बाजारपेठ येथील पटकीदेवी मंदिर येथून सुरू होणार असून ती बाजारपेठेतून तहसीलदार कार्यालयापर्यंत जाणार आहे. शहरातील सर्व प्रतिष्ठीत नागरिक, व्यापारी, शिक्षक, रोटरी सदस्य, डॉक्टर्स, वकील, विद्यार्थी, अंगणवाडी सेविका, सर्व पक्षीय कार्यकर्ते, पदाधिकारी, विविध संघटना आदींनी यात्रेत सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.