You are currently viewing खरा धर्म मानव धर्म

खरा धर्म मानव धर्म

 

कदाचित या अडाणी लोकांचा असा समज असेल ( नव्हे, असाच समज आहे व असतो ) की अशा तऱ्हेने धर्म प्रसाराचे कार्य केल्याने आपल्याला महापुण्य मिळून मेल्यानंतर स्वर्गाचे दरवाजे उघडले जातील व तेथे पर्या, अप्सरा, अमृत वगैरे मिळून चैन व मौज करता येईल. वास्तविक काय गंमत आहे पहा ! या जगात प्रत्यक्ष जीवन जगत असताना आपली काय परिस्थिती आहे, ती परिस्थिती प्रयत्नांची कास धरून अधिक चांगल्या रीतीने कशी सुधारता येईल, धर्म- धर्म म्हणून आपण जे कवटाळून बसतो तो धर्म आपली परिस्थिती सुधारू शकतो का, इतर धर्मीयांचा द्वेष, तिरस्कार किंवा हत्या करून आपण आतापर्यंत आपले काय हित साधले ? वगैरे गोष्टींचा विचार करण्याऐवजी हे धर्मवेडे अडाणी लोक मेल्यानंतर स्वर्ग मिळेल, या खुळचट कल्पनेच्या वर अंधश्रद्धेच्या आहारी जाऊन स्वतःच्या व इतरांच्या नाशास कारणीभूत ठरतात.

( क्रमशः )

 

*– सद्गुरु श्री वामनराव पै.*

प्रतिक्रिया व्यक्त करा

five + four =