या तालुक्यातील बहुतांशी नवीन घरे मीटर कनेक्शन पासून वंचित

या तालुक्यातील बहुतांशी नवीन घरे मीटर कनेक्शन पासून वंचित

सावंतवाडी :

 

सावंतवाडी तालुक्यात घर बांधण्याची कामे पूर्ण झाली. तरी देखील वीज वितरण कंपनीने अद्यापही या घरांना मीटर कनेक्शन दिले नाही. तालुक्यात एकूण १८६ मीटर मागणी करण्यात आली होती. यातील मे महिन्यात ३७ कनेक्शन देण्यात आली असून १४९ मीटर कनेक्शन प्रलंबित आहे. याबाबतची माहिती महावितरण उपअभियंता बागलकर यांनी दिली.

नवीन मीटर कनेक्शन ची मागणी ग्राहकांकडून महावितरणकडे केली जाते. या वेळी तब्बल १८६ नवीन मीटर ची मागणी कुडाळ डिव्हिजन ऑफिस कडे करण्यात आली होती. गेल्या मे महिन्यामध्ये डिव्हिजन ऑफिस कडून ४० मीटर सावंतवाडी महावितरण पुरवण्यात आले होते.

यातून तालुक्यातील ३७ कनेक्शन देण्यात आली आहेत. मात्र तब्बल १४९  मीटरविना प्रलंबित आहेत. नवीन घर बांधण्याची कामे तसेच इतर कामे पूर्णत्वास आल्याने या ग्राहकांवर काळोखात वेळ घालवण्याची पाळी आली आहे. मीटरच नसल्यामुळे अनेक समस्यांना त्यांना सामोरे जावे लागत आहे. सध्या वर्क फ्रॉम होम मध्ये अनेक नोकरदार वर्ग असून मीटर तुटवड्यामुळे त्यांनाही मोठा फटका बसला आहे. आता माध्यमिक व उच्च माध्यमिक, प्राथमिक शाळा ऑनलाईन पद्धतीने घेण्याचा निर्णय असल्याने त्याही आता ऑनलाईन पद्धत सुरू होणार आहेत. त्यामुळे मीटर तुटवड्याचा फटका शालेय मुलांच्या शिक्षणावरही होणार आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा