You are currently viewing टोकाचा संघर्ष करावा लागला तरी बेहत्तर; नगरपंचायतीची बदनामी खपवून घेणार नाही

टोकाचा संघर्ष करावा लागला तरी बेहत्तर; नगरपंचायतीची बदनामी खपवून घेणार नाही

कणकवली नगराध्यक्ष समीर नलावडे यांचा संदेश पारकरांवर पलटवार

कणकवली

लगतच्या घरांना धोका असल्याने पाडलेल्या कणकवलीतील मोरये बिल्डिंग वादात संदेशपारकर यांना पडण्याची गरज नव्हती.या विषयात पडून कणकवली शहरात तणाव निर्माण करण्याचा डाव संदेश पारकर यांचा आहे.कणकवली नगरपंचायतला अड्डा म्हणणाऱ्या माजी नगराध्यक्ष पारकर यांचे अड्डे कणकवलीकर जाणून आहेत.

जुगार, पट, गांजा विक्री कणकवली शहरात कोणाचे कार्यकर्ते कोणाच्या वरदहस्त असल्याने करतात हे लवकरच जनतेसमोर आणणार असल्याचा इशारा कणकवली नगरपंचायतीचे नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी देतानाच आहे.नगरपंचायतला अड्डा म्हणताना लाज वाटली पाहिजे. यापूढे अशी वक्तव्ये आम्ही खपवून घेणार नाही.प्रसंगी टोकाचा संघर्ष करावा लागला तरी बेहत्तर असा इशाराही नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी दिला आहे. कणकवली नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष दालनात आयोजित पत्रकार परिषदेत नगराध्यक्ष समीर नलावडे व उपनगराध्यक्ष बंडू हर्णे यांनी संदेश पारकर यांच्या वक्तव्याचा समाचार घेताना जोरदार टीकास्त्र सोडले.

समीर नलावडे म्हणाले, येत्या वर्षभरात कणकवली नगरपंचायतची निवडणूक होणार असून संदेश पारकर याना शिवसेनेच्या वरिष्ठांनी नगरसेवक पदाची निवडणूक लढवण्यास सांगितले असावे. शिवसेनेत कुठलेही पद न मिळाल्याने पारकर नगरसेवक निवडणुकीची तयारी करत असावेत असा माझा समज असल्याचे सांगत नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी शिवसेना नेते संदेश पारकर यांना लगावला. कणकवली नगरपंचायतचे नाव बदनाम करण्याचा प्रयत्न संदेश पारकर यांच्याकडून होत असल्याचा आरोपही नलावडे यांनी केला. राजकारणात ज्युनिअर असणाऱ्या वैभव नाईक यांचा पीए म्हणून मंत्रालयात काम करणाऱ्या संदेश पारकर यांनी मागील दिवस आठवावेत. स्वतः नगराध्यक्ष असताना नगरपंचायतचे बेअरर चेक काढून नगरपंचायतचे पैसे कसे लाटलात हे जनतेला माहिती आहे. थकबाकी ठेवण्याच्या प्रवृत्तीमुळे अनेक कार्यकर्ते का सोडून गेले ? याचे आत्मपरिक्षण करण्याची वेळ संदेश पारकर यांनी करावे.

भालचंद्र महाराज आणि आप्पासाहेब पटवर्धनांचे नाव घेत शहरातील युवा पिढी बरबाद करताना लाज वाटली पाहिजे .पोलिसांवर आळ घेताना साळुंखे नामक पोलीस अधिकाऱ्यावर हात उचलला आणि शहरातून पळ काढला होता हे विसरू नका. 2003 साली मी सोबत होतो म्हणून नगराध्यक्ष झालात. जेव्हा मी 2007साली पारकरांची साथ सोडली तेव्हापासून पारकर कणकवली नगरपंचायत सत्तेपासून लांब आहेत. पारकरांवर विश्वास नाही म्हणूनच कणकवलीकरानी त्यांना पराभूत करून मला नगराध्यक्ष केले. शहरवासीयांचा माझ्यावर आणि उपनगराध्यक्ष बंडू हर्णे, आणि सहकारी नगरसेवकांवर विश्वास असल्यानेच 2003 पासून नगरपंचायत ची सत्ता आमच्याकडे आहे.नगरपंचायतला अड्डा म्हणताना लाज वाटली पाहिजे.

यापूढे अशी वक्तव्ये आम्ही खपवून घेणार नाही.प्रसंगी टोकाचा संघर्ष करावा लागला तरी बेहत्तर असा इशारा नगराध्यक्ष नलावडे यांनी दिला. टोनमारे प्रकरण घडले तेव्हा नगराध्यक्ष संदेश पारकर हेच होते हे त्यांना माहीत नाही का ?असा सवाल करताना समीर नलावडे म्हणाले, म्हणजे हा प्रकार त्यानीच घडविला होता याचाच पुरावा त्यांनी दिला आहे. भाडेकरू आणि जमीनमालक वाद रहा न्यायालयात गेला आहे. त्यामुळे न्यायालय आणि प्रशासन याबाबत निर्णय घेईल. या विषयात आम्ही पडणार नाही. परंतु संदेश पारकर यांनी या विषयावरून कणकवली नगरपंचायतीची नाहक बदनामी करु नये. एकेकाळी संदेश पारकर हे कणकवली नगरपंचायतीचे नगराध्यक्ष होते याची निदान जाणीव तरी त्यांनी ठेवावी आणि जनाची नाही तर मनाची लाज वाटत असेल तर नगरपंचायतीला अड्डा म्हणू नये असा सल्ला समीर नलावडे यांनी दिला आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा