You are currently viewing “जिल्ह्यासाठी अजुन व्हेंटिलेटर देऊन ऑक्सिजन प्लांट लवकर सुरु करणार”

“जिल्ह्यासाठी अजुन व्हेंटिलेटर देऊन ऑक्सिजन प्लांट लवकर सुरु करणार”

पालकमंत्री उदय सामंत आणि खासदार विनायक राऊत यांची शिवसेना नेते संदेश पारकर यांना ग्वाही

लॉकडाऊनमधे थोडी शिथिलता देण्यात आली असली तरी व्यापार व उद्योगासाठी देण्यात आलेली वेळ हि तुटपुंजी असुन वेळ कमी असल्याने बाजारपेठांमध्ये गर्दी होत आहे. या गर्दीमुळे कोरोना संक्रमण धोका अधिक वाढत आहे.
तौक्ते वादळामुळे जिल्ह्यात घरांची, मच्छिमारांची तसेच शेतीबागायतींची खुप मोठी हानी झाल्याने प्रशासनाला त्वरीत पंचनामे करण्याचे आदेश देऊन लवकरात लवकर नुकसानभरपाई यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे.
तसेच जिल्ह्यातील कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता व्हेंटिलेटर व ऑक्सिजनची कमतरता भासत आहे. यासाठी जिल्ह्यासाठी अधिक प्रमाणात व्हेंटिलेटर व ऑक्सिजन उपलब्ध होणे गरजेचे आहे. तसेच जिल्ह्यासाठी मंजुर झालेले ऑक्सिजन प्लांट लवकरात लवकर सुरु करणे आवश्यक आहे.
वरील सर्व बाबींचा प्राधान्याने विचार करुन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे सर्व प्रकारच्या व्यापारासाठीची वेळ वाढवून मिळावी यासह तौक्ते वादळामुळे जिल्ह्यातील जनतेची जी काही हानी झाली आहे त्याची त्वरीत नुकसानभरपाई मिळावी. तसेच जिल्हासाठी व्हेंटिलेटर व ऑक्सिजन अधिक प्रमाणात उपलब्ध करुन मिळावेत अश्या विविध मागण्या शिवसेना नेते संदेश पारकर यांनी पालकमंत्री उदय सामंत आणि खासदार विनायक राऊत यांच्याकडे केल्या.
वरील सर्व मागण्यांचा प्राधान्याने विचार करुन हे सर्व प्रश्न त्वरीत मार्गी लावले जातील अशी ग्वाही पालकमंत्री उदय सामंत व खासदार विनायक राऊत यांनी संदेश पारकर यांना दिली.

प्रतिक्रिया व्यक्त करा

four × two =