You are currently viewing सावंतवाडीतील कै.भाऊसाहेब परुळेकर नर्सिंग होम व आनंद पॉलिक्लिनिक मध्ये गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर सुरू होते नवीन रुग्णसेवा

सावंतवाडीतील कै.भाऊसाहेब परुळेकर नर्सिंग होम व आनंद पॉलिक्लिनिक मध्ये गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर सुरू होते नवीन रुग्णसेवा

सावंतवाडीत मिळणार न्युरोलॉजी (मेंदू विकार तज्ञ) सेवा

विशेष संपादकीय…

सावंतवाडी माठेवाडा येथील कै.भाऊसाहेब परुळेकर नर्सिंग होम व आनंद पॉलिक्लिनिक मध्ये गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर नवीन रुग्णसेवेचा शुभारंभ होत आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात मेंदू विकार तज्ञाची कमतरता प्रकर्षाने भासत होती. न्यूरोलॉजीच्या उपचारांसाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रुग्णांना कोल्हापूर अथवा गोवा येथे जावे लागत होते. परंतु गेली सतरा वर्षे मेंदू विकाराच्या अनेक गुंतागुंतीच्या रुग्णांवर यशस्वी उपचार केलेले व तेलंगणा राज्यातील निजामाबाद येथील वैद्यकीय महाविद्यालयात न्युरोलॉजी विषयाचे सह प्राध्यापक म्हणून काम केलेले डॉ. मुकुंद अंबापुरकर हे सावंतवाडीत कायमस्वरूपी रुग्णसेवा देणार आहेत. डॉ.अंबापुरकर हे न्युरोलॉजिस्ट असून पक्षाघात, आकडीचा आजार, कंपवात, स्मृतीभ्रंश अशा अनेक मेंदूविकार ग्रस्त रुग्णांवर त्यांनी यशस्वी उपचार केले आहेत. EEG, nerve conduction study अशा चाचण्या व तंत्रज्ञानाच्या आधारे ते रुग्ण तपासणी व उपचार करतील. डॉ.मुकुंद अंबापुरकर यांच्या सावंतवाडी येथे सुरू होणाऱ्या रुग्ण सेवेमुळे सिंधुदुर्ग जिल्ह्याला भासत असलेली न्युरोलॉजिस्टची कमतरता पूर्ण होणार आहे.
नव्याने रुग्णसेवा सुरू होणाऱ्या आनंद पॉलीक्लिनिक मध्ये डॉ.मृदुला महाबळ अंबापुरकर या स्त्रीरोग, प्रसूती आणि वंधत्व चिकित्सा तज्ञ असून गेली 15 वर्ष निजामाबाद तेलंगणा येथील रुग्णालयात त्यांनी अनेक गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया यशस्वीरित्या केलेले आहेत. वंध्यत्व चिकित्सा (IVF) यासंबंधी विशेष प्रशिक्षण घेतलेल्या डॉ.मृदुला यांनी वंधत्व असलेल्या (गर्भधारणा न होणाऱ्या) अनेक महिलांना मातृत्वाचा आनंद प्राप्त करून दिलेला आहे. इंग्लंड येथील MRCOG पदवी संपादित डॉ.मृदुला या स्त्रीरोग शास्त्रातील विशेष तज्ञ डॉक्टर आहेत. डॉ.मृदुला या सावंतवाडी तालुक्यातील तळकट येथे माहेर असलेल्या मूळ रहिवासी आहेत.
डॉक्टर अंबापुरकर दाम्पत्यांच्या जोडीने आनंद पॉलीक्लिनिक मध्ये सावंतवाडीच्या मिलाग्रीस हायस्कूल तसेच एस पी के कॉलेज मध्ये शिक्षण घेऊन मुंबई येथून एमबीबीएस करून सतरा वर्षे इंग्लंडमध्ये पुढील शिक्षण घेतलेले मूळ मालवण तालुक्यातील विरण गावचे डॉ.मनिष कुशे हे इंडॉक्रिनोलॉजी म्हणजेच थायरॉईड सह शरीरातील इतर हार्मोन्स आणि ग्रंथी विकार विशेष तज्ञ म्हणून सेवा देणार आहेत. डायबिटीस, थायरॉईड शरीरातील अनेक ग्रंथी निगडीत आजारांवर उपचार करणार करणारे हे विशेष तज्ञ डॉक्टर आहेत. इंडॉक्रिनोलॉजी या विषयात अनेक पदव्या प्राप्त केल्यानंतर डॉ.कुशे गोवा येथील मडगाव आणि पणजी या ठिकाणी प्रॅक्टिस करत आहेत. डॉ.मनिष कुशे हे महिन्यातील दोन रविवारी सकाळी १०.०० ते दुपारी १.३० वाजेपर्यंत आनंद पॉलीक्लिनिक मध्ये रुग्ण तपासणी करतील.
सावंतवाडी शहरात तज्ञ कार्डिओलॉजी (हृदय रोग विशेषज्ञ) डॉक्टरांची कमतरता भासत होती. ओल्ड गोवा येथील “हेल्थ वे” या हॉस्पिटलच्या अतिदक्षता कार्डियाक केअर युनिटचे प्रमुख डॉ.अजेय मुंढेकर हे देखील दर बुधवारी आनंद पॉलिक्लिनिक येथे सकाळी १०.३० ते दुपारी १.३० वाजेपर्यंत रुग्ण तपासणी करतील. डॉ.अजेय यांनी अनेक गुंतागुंतीच्या ॲन्जिओप्लास्टी यशस्वीपणे केलेले आहेत. या क्षेत्रात त्यांचे विशेष प्राविण्य आहे. भारतासह इंग्लंडमध्ये देखील त्यांनी कार्डिओलॉजी क्षेत्रात अनेक रुग्णांवर उपचार केले आहेत. रक्तदाब, हृदयरोग आणि तत्सम रुग्णांसाठी डॉ.अजेय मुंढेकर नक्कीच वरदान ठरणार आहेत. डॉ.अजेय मुंढेकर हे गतकाळातील सामाजिक कार्यकर्ते आणि “वैनतेय” या वृत्तपत्राचे संस्थापक, ज्येष्ठ पत्रकार, संपादक कै.मे.द. शिरोडकर यांचे नातू असून सावंतवाडी येथेच आजोळ असल्याने त्यांचे या मातीशी सुद्धा जिव्हाळ्याचे संबंध आहेत.
सावंतवाडी येथे सुरू होणाऱ्या नव्या रुग्ण सेवेमुळे सावंतवाडी सह सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक रुग्णांना दिलासा मिळणार आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याला मेंदू विकार तज्ञ, कार्डिओलॉजी तज्ञ, वंध्यत्व चिकित्सा त्याचप्रमाणे हार्मोन्स आणि ग्रंथी विकार वर इंडोक्रिनोलॉजी तज्ञ अशा विविध विकारांवरील उपचार एकाच छताखाली मिळणार आहेत. त्यामुळे कै.भाऊसाहेब परूळेकर नर्सिंग होम व आनंद पॉलिक्लिनिक हे सिंधुदुर्ग जिल्हावाशीयांसाठी लाभदायक ठरणार आहे. आनंद पॉलीक्लिनिक मध्ये सुरु होणाऱ्या सर्व सेवांची माहिती हॉस्पिटलचे डॉ.जयेंद्र परुळेकर (बालरोगतज्ञ) व कान नाक घसा तज्ञ डॉ. लीना परुळेकर यांनी दिली.

प्रतिक्रिया व्यक्त करा

ten + 1 =