You are currently viewing धर्म या संकल्पनेत पाप – पुण्याचे स्थान काय ?

धर्म या संकल्पनेत पाप – पुण्याचे स्थान काय ?

 

आजच्या परिस्थितीचे अवलोकन केले तर असे दिसून येते की, पैसा हाच माणसाचा देव झालेला आहे. हा ” पैसा ” मिळवण्यासाठी माणसे वाटेल ते करण्यास व वाटेल त्या थरापर्यंत जाण्यास मागे पुढे पाहत नाहीत. वर्तमान पत्रातील बातम्या वाचल्या म्हणजे वरील सत्याची जाणीव होईल. असा मिळाला की, माणसाला सत्ता, संपत्ती वगैरे सर्व काही प्राप्त होऊ शकते म्हणून लोक पैशाच्या मागे पिसाटासारखे पळत सुटतात. परंतु एक महत्त्वाची गोष्ट माणूस विसरतो ती ही की, पैसा माणसाला सुख, शांती, समाधान प्राप्त करून देण्यास समर्थ ठरत नाही. परंतु हे शहाणपण माणसाला सर्व काही होऊन गेल्यानंतर सुचते, हीच मानव जातीची खरी शोकांतिका आहे. म्हणूनच जीवंविद्या सांगते की ” दुसऱ्यांच्या अनुभवावरून जे शिकवता ते खरे शहाणे, स्वतःच्या अनुभवावरून जे शिकतात ते दीडशहाणे आणि कोणाच्याच अनुभवावरून शिकत नाही ते पेडगावचे शहाणे.” पैशासाठी सर्वप्रथम माणूस माणुसकी हरवून बसतो आणि त्यानंतर त्याच्याकडून दुष्कर्मांची साखळीच निर्माण होत जाते व सरते शेवटी त्याचा सर्वनाश होतो.

( क्रमशः..)

*–सद्गुरू श्री वामनराव पै.*

प्रतिक्रिया व्यक्त करा

three × 5 =