You are currently viewing मनसे जिल्हाध्यक्षांना आदेश पाळावेच लागतील, अन्यथा कारवाई अटळ…

मनसे जिल्हाध्यक्षांना आदेश पाळावेच लागतील, अन्यथा कारवाई अटळ…

परशुराम उपरकरांचा इशारा; प्रभारी तालुकाध्यक्षांची “ती” निवड नियमबाह्य…

सावंतवाडी

प्रसाद गावडे हेच कुडाळ मनसेचे तालुकाध्यक्ष आहेत. त्याठिकाणी झालेली दुसरी निवड ही नियमबाह्य आहे. मनसे जिल्हाध्यक्ष धीरज परब यांना पक्षाचे आदेश मानावेच लागतील, अन्यथा त्यांच्यावर कारवाई अटळ आहे, असा इशारा मनसेचे नेते परशुराम उपरकर यांनी आज येथे दिला. आमच्या पक्षात पत्र देण्याची पद्धत नाही. एकदा नेत्यांनी निर्णय घेतला की तो “फायनल” असतो. त्यामुळे कोणाला वेगळे पत्र देण्याची गरज नाही, असे ते म्हणाले. जिल्हाध्यक्षांची भूमिका एकाधिकारशाही नसून ते त्यांचे अज्ञान आहे, असेही त्यांनी सांगितले.

यावेळी उपजिल्हाध्यक्ष दया मेस्त्री, कुडाळ तालुका अध्यक्ष प्रसाद गावडे, सावंतवाडी शहराध्यक्ष आशिष सुभेदार, विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष कुणाल किनळेकर, उपतालुकाअध्यक्ष प्रकाश साटेलकर, संतोष भैरवकर, बाबल गावडे, संदेश शेट्ये, सुंदर गावडे, आकाश परब, अभय देसाई, मंदार नाईक, नंदू परब, विष्णू वस्कर, विश्वनाथ राउळ आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा