You are currently viewing राष्ट्रवादीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी युवा उद्योजक आसिफ शेख यांची निवड…

राष्ट्रवादीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी युवा उद्योजक आसिफ शेख यांची निवड…

सावंतवाडी

बांदा येथील युवा उद्योजक आसिफ शेख यांची सिंधुदुर्ग जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांच्या हस्ते त्यांना नुकतेच नियुक्तीपत्र देण्यात आले. त्यांच्या पक्षातील कार्याचा अनुभव लक्षात घेऊन त्यांची वर्णी लावण्यात आली आहे. या निवडीमुळे अल्पसंख्यांक समाजातील तरुण वर्गाला संधी मिळणार आहे.

यावेळी माजी राज्यमंत्री प्रविण भोसले, प्रदेश संघटक सचिव काका कुडाळकर, सरचिटणीस भास्कर परब, सावंतवाडी तालुका अध्यक्ष पुंडलिक दळवी, अल्पसख्याक कार्याध्यक्ष नझीरभाई शेख, असिफ शेख, उपाध्यक्ष सुनील भोगटे, सावंतवाडी शहराध्यक्ष देवेंद्र टेमकर, संतोष जोईल, इफ्तिकार राजगुरू आदी उपस्थित होते. नवनियुक्त उपाध्यक्ष आसिफ शेख यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.

जिल्ह्यातील अल्पसंख्याक समाजाला योग्य प्रतिनिधीत्व राष्ट्रवादी काँग्रेसने दिल्याने अल्पसंख्याक समाजामध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून भविष्यात या पदाचा उपयोग सर्व सामान्य जनतेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची ध्येयधोरणे व विचार पोहचवून संघटना व जिल्हाध्यक्ष यांचे पक्षीय संघटन बळकट करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगून राष्ट्रवादी काँग्रेसची घड्याळ ही निशाणी घराघरात पोहोचविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे यावेळी शेख यांनी सांगितले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

2 × three =