You are currently viewing न्हावेली देवस्थानचे प्रमुख मानकरी तथा काँगेस चे ज्येष्ठ कार्यकर्ते सुधाकर नाईक यांचे निधन

न्हावेली देवस्थानचे प्रमुख मानकरी तथा काँगेस चे ज्येष्ठ कार्यकर्ते सुधाकर नाईक यांचे निधन

न्हावेली (सावंतवाडी)

देवस्थानचे प्रमुख मानकरी तथा काँगेसचे ज्येष्ठ कार्यकर्ते सुधाकर विठ्ठल नाईक (५८) यांचे मंगळवारी रात्री हृदयविकाराच्या धक्याने दुःखद निधन झाले. सामजिक कार्यकर्ते बंटी नाईक यांचे ते वडील होत,
निधनाचे वृत्त कळताच माजी राज्यमंत्री तथा आमदार दीपक केसरकर यांनी बंटी नाईक यांचे सांत्वन केले. माजी राज्यमंत्री प्रविण भोसले, सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेस अध्यक्ष चंद्रकांत उर्फ बाळा गावडे, माजी राज्यमंत्री दिपक केसरकर यांचे स्विय सहाय्यक गजा नाटेकर,सावंतवाडी पंचायत समितीचे माजी सदस्य नारायण उर्फ बबन राणे, माजी सरपंच शरद धाऊसकर, एकनाथ परब, उपसरपंच विशाल गावडे आदी राजकिय आणि सामजिक शेत्रातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी अंत्यदर्शनासाठी गर्दी केली होती.
त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

15 + seventeen =