You are currently viewing सहवास

सहवास

जागतिक कला व्यक्तित्व विकास मंच सदस्य लेखक कवी प्रमोद सूर्यवंशी यांचा लेख

सहवास हा आयुष्यासाठी खूप गरजेचा आहे .
लोक म्हणतात की, आयुष्य हे पैसा अड़का यामुळे चालत आहे . पण एक सांगतो मित्रांनो तुम्हाला आयुष्य हे प्रेम , श्रध्दा आणि सहवास या गोष्टीमुळे आहे .
पहिला पहिला सहवास आपल्याला आईचा लागतो
कारण आपण नऊ महिने आईच्या उदरी असतो आणि हा सहवास मायेच्या प्रेमाचा असतो . नंतर जन्म होतो मग आई वडिलांचा तसे अनेक नातेवाईक यांचा सहवास लाभतो , काही लोकांकडून शिकायला मिळते, काही लोकांकडून नवीन गोष्टीची जाणीव होते, आणि आपल्या आयुष्याला नवीन वळण ही लागतं, ते एका शब्दामुळे तो म्हणजे ” सहवास ”
दुसरा सहवास लाभतो मित्र मैत्रिणीचा आपण या सहवासात प्रेम करायला लागतो ,मैत्रीसाठी खेळतो, लढतो, झगड़तो , रूसतो ,
कोण रूसलेला असेल तर प्रेमाने आपण एकत्र येऊन त्याचा रुसवा दूर करतो . हे सगळं काही सहवासामुळेच होत हे खरच आहे.
तिसरा सहवास लाभतो तो म्हणजे आपली आपल्या हक्काची जवळीची आपल्याला समजणारी आपल्या प्रेमाला समजून घेणारी ती म्हणजे प्रियेसी त्या नंतर होते ती आपली बायको…
तसं बघायला गेले तर आई वडिलां नंतर जास्त सहवास आपल्या प्रिय व्यक्ति बरोबर घालवतो असे माझे मत आहे . सुखदुःखाच्या सगळ्या गोष्टी आपण तिला सांगतो .
आणि ते एक शब्दामुळे तो म्हणजे ” सहवास “.
सहवास हा देवाला ही गरजेचा होता . जगाला तारण्यांसाठी असू दे या किंवा जगाला प्रेम शिकवण्यासाठी असू दे .भक्ताचा सहवास देवाला आणि देवाचा सहवास भक्ताला असला की तेव्हाच भक्ति पूर्ण होते.
पण आजच्या काळात सहवास कुठे तरी दुरावला गेला आहे .
आई वडील नातेवाईक असू दे
मित्रांपासून ,
जिथे पैसा तिथे सहवास असं झालं आहे. आजच्या कलियुगात
पण मी एक म्हणेन जाता जाता सहवास सगळ्यां सोबत ठेवा कारण हे
देवाचं पहिलं नाव प्रेम असेल
तर
देवाचं दूसरं नाव सहवास आहे .

🙏 धन्यवाद 🙏

प्रमोद न सूर्यवंशी
मुंबई

प्रतिक्रिया व्यक्त करा