You are currently viewing कळसुली गावांतील रस्ते पाणी व पुनर्वसन सह आधी विकास कामे सुरू करा…

कळसुली गावांतील रस्ते पाणी व पुनर्वसन सह आधी विकास कामे सुरू करा…

नंतरच मुख धरणाचे काम सुरू करा अन्यथा माझ्याशी तुमचा संघर्ष अटळ आहे – सुशांत दळवी

कणकवली तालुक्यातील कळसुली गावात होत असलेल्या देनदोन वाडी प्रकल्पाला कळसुली ग्रामस्थांनी थांबवत प्रथम गावातील रस्ते पाणी व पुनर्वसन प्रश्न मार्गी लावावेत नंतरच प्रकल्प सुरू करावा अशी भूमिका सामाजिक कार्यकर्ते सुशांत दळवी यांनी घेत कळसुली ग्रामस्थांच्या वतीने कार्यकारी अभियंता सिंधुदुर्ग याना प्रकल्पाचे काम थांबवण्याचे पत्र दिले आहे

कळसुली गावात पायाभूत सुविधांचा मोठा अभाव असल्याने अधिकारी ग्रामस्थ व खासदार विनायक राऊत साहेब यांच्यासोबत बैठक झाली त्या बैठकीमध्ये गावातील रस्थे पाणी अंतरंग सोई सुविधा उभराव्यात नंतर मुख धरणाचे काम सुरू करावे अशी प्रमुख मागणी गावातील ग्रामस्थांनी केली होती.
सुशांत दळवी, संतोष मुरकर ;बळीराजा राणे,सुनील हरमलकर, वैभव मुरकर यांनी कार्यकारी अभियंता यांच्याकडे निवेदनात द्वारे केली आहे . कार्यकारी अभियंता यांनी सुशांत दळवी यांनी केलेली मागणी मान्य केली व सुरुवात डांबरीकरण रस्त्या पासून होईल असे सांगितले तसेच सुशांत दळवी यांनी प्रशासनाचे अधिकारी यांचे आभारही मानले

प्रतिक्रिया व्यक्त करा

8 + fourteen =