You are currently viewing महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 3 एप्रिल रोजी

महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 3 एप्रिल रोजी

सिंधुदुर्गनगरी 

महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात येणारी महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्‍त पूर्व परीक्षा 2021 ही रविवार दि.3 एप्रिल 2022 रोजी कणकवली तालुक्यातील एकूण 3 उपकेंद्रावर  सकाळी 11 ते दुपारी 12 या वेळेत होणार असल्याचे माहिती निवासी उपजिल्हाधिकारी दत्तात्रय भडकवाड यांनी दिली आहे.

      कणकवली तालुक्यातली विद्यामंदिर माध्यमिक प्रशाला, कणकवली व एस.एम. हायस्कूल, कणकवली व कणकवली कॉलेज कणकवली, (जुनी इमारत) या 3 उपकेंद्रावर ही परीक्षा घेण्यात येणार आहे. या परीक्षेसाठी एकूण 996 उमेदवार बसणार आहेत. सदर परीक्षेच्या आयोजनाबाबत उमेदवारांना महत्वाच्या सूचना खालीलप्रमाणे आहेत.

Ø आयोगामार्फत आयोजित परीक्षामध्ये कॉपीचा, गैरप्रकाराचा प्रयत्न करणाऱ्या घटनांची आयोगाकडून गंभीर दखल घेतली जाणार आहे.

Ø  अशा प्रकरणी आयोगाकडून संबंधितांवर फौजदारी व प्रशासकीय अशा दोन्ही स्वरुपाची कारवाई करण्यात येणार आहे.

Ø  परीक्षांकरिता आयोगाने कडक उपाययोजना केलेल्या आहेत.

Ø परीक्षा उपकेंद्रांवर उमेदवारांची आयोगाकडून नियुक्त करण्यात आलेल्या सेवा पुरवठादार संस्थेच्या कर्मचाऱ्याकडून तपासणी (Frisking)करण्यात येणार आहे.

Ø  आयोगाकडून परीक्षेच्या पर्यवेक्षणासाठी विशेष निरीक्षक भरारी पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे.

Ø  जिल्हाधिकारी स्वत:पर्यवेक्षणावर लक्ष ठेवणार असल्याचे ही निवासी उपजिल्हाधिकारी  श्री. भडकवाड  यांनी कळविले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा