सिंधुदुर्गात रात्री ११ ते सकाळी ६ या वेळेत ऐच्छिक संचारबंदी

सिंधुदुर्गात रात्री ११ ते सकाळी ६ या वेळेत ऐच्छिक संचारबंदी

पालकमंत्री उदय सामंत ; परवानगी घेतल्याशिवाय कार्यक्रम केल्यास कारवाई करण्याचे आदेश

सिंधूदुर्गनगरी

कोरोना प्रादुर्भाव वाढू नये यासाठी सिंधूदुर्ग जिल्ह्यात रात्री ११ ते सकाळी ६ या वेळेत ऐच्छिक संचारबंदी लागू करण्यात आली आहे. यासाठी नागरिकांनी सहकार्य न केल्यास कायदेशीर संचारबंदी लागू करावी लागेल. तसेच मास्क न वापरल्यास २०० ऐवजी ५०० रोये दंड रक्कम करण्यात आली आहे. आठवडा बाजार बंद करण्यात यावा. यापुढे कोणतेही कार्यक्रम परवानगी घेतल्याशिवाय केल्यास कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांना देण्यात आले आहेत, अशी माहिती पालकमंत्री उदय सामंत यानी पत्रकार परिषदेत दिली. पालकमंत्री सामंत यानी सोमवारी सायंकाळी ऑनलाईन पद्धतीने पत्रकार परिषद आयोजित केली होती. मंत्रालयातील आपल्या दालनात घेतलेल्या या पत्रकार परिषदेला खा विनायक राऊत उपस्थित होते. यावेळी बोलताना मंत्री सामंत यानी, आज जिल्हाधिकारी यांच्याशी कोरोना बाबत बैठक झाली. या बैठकीला जिल्हा परिषद अध्यक्षा समिधा नाईक, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ हेमंत वसेकर, जिल्हा पोलिस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांच्यासह अन्य उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा