You are currently viewing रत्नागिरी जिल्ह्यातील पूरग्रस्तांना मदतीचा हात 

रत्नागिरी जिल्ह्यातील पूरग्रस्तांना मदतीचा हात 

देवगड तालुका ऑल इंडिया धनगर समाज महासंघ कार्यकारिणीचा स्तुत्य उपक्रम

ऑल इंडिया धनगर समाज महासंघ दिल्लीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष प्रवीण काकडे  यांच्या नेतृत्वाखाली नुकतेच नव्याने नियुक्ती झालेले सिंधुदुर्ग धनगर समाज बुलंद आवाज युवा नेतृत्व ऑल इंडिया धनगर समाज महासंघाचे कोकण प्रदेशाध्यक्ष नवलराज काळे यांनी संपूर्ण कोकणामधील पूरग्रस्त धनगर समाज बांधवांच्या झालेल्या नुकसानीचा आढावा घेतला होता. यासंदर्भात रायगड जिल्ह्यातील तालुका महाड मधील काही समाज बांधवांना सावंतवाडी वसई प्रवासी संघटनेतर्फे अमित जंगम व त्यांच्या टीम मार्फत 20 ते 25 राशन किटची उपलब्ध करून साहित्य पोच करण्याचे काम नवलराज काळे यांनी केले.

रायगड मधून, महादेव कारंडे जिल्हा अध्यक्ष रायगड आनंदराव कचरे , महाड तालुका युवा अध्यक्ष भाऊ कचरे, संतोष शिंगाडे, दत्तात्रेय शिंगाडे, शिवाजी हिरवे, त्याच प्रमाणे खेड चिपळूण येथील, रत्नागिरी जिल्हा अध्यक्ष विजय गोरे, ॲड. मिलिंद जाडकर, निलेश आखाडे, रत्नागिरी तालुका अध्यक्ष झोरे,प्रशांत आखाडे, मंगेश गोरे, धनगर युवाशक्तीचे पत्रकार प्रकाश खरात, विजय बोडेकर यांच्याशी संवाद साधत संपूर्ण खेड चीपळून तालुक्यातील त्या पूरग्रस्त भागातील परिस्थितीचा आढावा त्यांनी घेतला होता व लागेल तशी मदत महासंघाच्या माध्यमातून करण्याचे आश्वासन दिले.

लोकप्रतिनिधी व संस्थांकडून मदत कार्य पुरवण्याचे काम आम्ही करू आपण त्या ठिकाणी धीर धरा व ग्रामस्थांना दिलासा दया असे सांगत. काळे हे तिथल्या सर्व समाज बांधवांच्या समाज संघटनेच्या प्रतिनिधींच्या कायम संपर्कात राहिले. महासंघाच्या आव्हानाला प्रोत्साहन देत देवगड तालुका अध्यक्ष विष्णू शेळके यांनी मदतीचे आवाहन करत देवगड तालुका अंतर्गत पूरग्रस्तांना मदत कार्य करण्यासाठी साहित्य गोळा करण्याचे काम चालू केले त्यानंतर एक गाडी करून ही देवगड ची सर्व टीम नवलराज काळे यांच्या मार्गदर्शनाखाली व देवगड तालुका अध्यक्ष विष्णू शेळके सचिव गोविंद जंगले यांच्या नेतृत्वाखाली आज दिनांक 4 ऑगस्ट 2021 रोजी खेड व चिपळूण येथे मदत कार्य घेऊन पोहचली व धनगर युवाशक्तीचे पत्रकार प्रकाश खरात यांच्या समवेत खेड चिपळूण मधी सर्व धनगर समाज बांधवांना साहित्य वाटप केले व तेथील परिस्थितीचा आढावा घेतला.

यावेळी देवगड तालुका युवा अध्यक्ष विष्णू शेळके तालुका युवक सचिव गोविंद जंगले विद्यार्थी आघाडी अध्यक्ष दीपक झोरे, धनगर युवाशक्तीचे पत्रकार प्रकाश खरात, सत्यवान जंगले, प्रदीप कोकरे, संकेत वरक, भूपेश कात्रे, वैभव कोकरे व इतर समाज बांधव उपस्थित.ही सेवा पुरवल्याबद्दल महासंघाचे कोकण प्रदेशाध्यक्ष नवलराज काळे यांनी देवगड टीमचे कौतुक केले असून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत. पुढील काळातही याठिकाणी पूरग्रस्त धनगर समाज बांधवांना ऑल इंडिया धनगर समाज महासंघ महाराष्ट्र राज्य व कोकण प्रदेश यांच्या वतीने महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष प्रवीण काकडे साहेब यांच्या मार्गदर्शनातून व कोकण प्रदेशाध्यक्ष नवलराज काळे साहेब यांच्या नेतृत्वाखाली महासंघाच्या माध्यमातून लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून असू दे किंवा इतर संस्थेच्या माध्यमातून असू दे विविध सेवा या ठिकाणी पुरवण्याचे काम महासंघ करेल असा विश्वास देवगड तालुका अध्यक्ष विष्णू शेळके यांनी व्यक्त केला आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा