You are currently viewing एसटी डेपो परिसरातील रस्त्यांसाठी आठ दिवसांची डेडलाईन

एसटी डेपो परिसरातील रस्त्यांसाठी आठ दिवसांची डेडलाईन

ठाकरे शिवसेनेच्या शिष्टमंडळाने आगार प्रमुखांची घेतली भेट

सावंतवाडी

येथील एसटी डेपो परिसरातील रस्त्याची अक्षरशा चाळण झाली आहे. जर रस्त्याचे काम 8 दिवसात सुरू न केल्यास उद्धव ठाकरे शिवसेनेच्या माध्यमातून जन आंदोलन उभारण्यात येईल असा ईशारा उद्धव ठाकरे गट उपजिल्हा संघटक शब्बीर मणियार यांनी आज येथे आगार प्रमुख यांना दिला. दरम्यान परिसरातील झालेल्या रस्त्याच्या चाळणमुळे धुळीचा त्रास देखील सहन करावा लागत आहे. त्यामुळे याची तात्काळ डागडुजी करा असे शब्बीर मणियार यांनी मागणी केली. आज शिवसेनेच्या शिष्य मंडळाने येथील आगार प्रमुख यांची भेट घेत विविध मागण्या संदर्भात लक्ष वेधले.

यावेळी उपजिल्हाप्रमुख चंद्रकांत कासार, शहर प्रमुख शैलेश गवंडळकर, विनोद ठाकूर, प्रविण वाडकर आदी उपस्थित होते.

यावेळी बोलताना शब्बीर मणियार म्हणाले एसटी डेपो परिसरात अक्षरशः रस्त्याचे चाळण झाली आहे त्यामुळे नागरिकांना हाल सोसावे लागत आहेत. याबाबत अनेक नागरिकांच्या तक्रारी देखील माझ्याकडे आल्या आहेत. त्यामुळे येत्या आठ दिवसात काम सुरू न झाल्यास दहाव्या दिवशी सर्व एसटी बंद करण्यात येतील असा इशारा देण्यात आला.

प्रतिक्रिया व्यक्त करा

one + four =