जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत व ओबीसी मोर्चा जिल्हाध्यक्ष महेश (छोटू) पारकर यांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान
देवगड : भाजपच्या ओबीसी मोर्चाची जिल्हा कार्यकारिणी नुकतीच जाहीर करण्यात आली असून, या नवनिर्वाचित कार्यकारिणीत भाजप पडेल ओबीसी मोर्चाच्या मंडल अध्यक्षपदी भुषण पोकळे यांची एकमताने नियुक्ती करण्यात आली आहे.
भाजप जिल्हा कार्यालय येथे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत आणि ओबीसी मोर्चाचे जिल्हाध्यक्ष महेश (छोटू) पारकर यांच्या हस्ते भुषण पोकळे यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. यावेळी जिल्ह्यातील आठही तालुक्यांतील पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
ओबीसी समाजातील विविध प्रश्न सोडविण्यासोबतच भाजपची पक्ष संघटना तळागाळापर्यंत अधिक मजबूत करण्याच्या उद्देशाने भुषण पोकळे यांची निवड करण्यात आली आहे. त्यांच्या या निवडीबद्दल भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि हितचिंतकांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत असून, पुढील वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा दिल्या जात आहेत.
दरम्यान, पालकमंत्री नितेश राणे यांनीही भाजपच्या संपूर्ण जिल्हा कार्यकारिणीला शुभेच्छा दिल्या आहेत.
