You are currently viewing सिंधुदुर्ग जिल्ह्यात काँग्रेस ‘महागाई मुक्त भारत’ सप्ताह आंदोलने करणार..

सिंधुदुर्ग जिल्ह्यात काँग्रेस ‘महागाई मुक्त भारत’ सप्ताह आंदोलने करणार..

– चंद्रकांत उर्फ बाळा गावडे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्रातील भारतीय जनता पक्षाचे सरकार सातत्याने महागाईत वाढ करून सामान्य जनतेची लूट करत आहे…पाच राज्यातील विधानसभा निवडणुकीवेळी पराभवाच्या चिंतेने पेट्रोल – डिझेल, LPG गॅस सिलिंडरच्या किमती सरकारने रोखून धरल्या होत्या..परंतु निवडणुका संपताच पुन्हा दरवाढ करून जनतेस लुटण्यास सुरवात केली आहे…मागील पाच दिवसात पेट्रोल, डिझेल, LPG गॅस सिलेंडर व CNG आणि PNG गॅस महाग केला आहे…. खाद्यतेल व इतर जीवनावश्यक वस्तूंच्या दरात ही मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने सर्वसामान्यांचे जगणे मुश्किल झाले आहे.
तसेच इंधन दरवाढीमुळे महागाई प्रचंड प्रमाणात वाढली आहे जनतेची खुलेआम लूट सुरू आहे… पण केंद्रातील सरकार मात्र डोळे बंद करून बसले आहे…. जनतेला लुटणाऱ्या सर्वसामान्यांच्या मेहनतीच्या कमाईवर डाका टाकण्याचा केंद्रातील भाजप सरकारच्या विरोधात आवाज उठवून सरकारला जागे करण्यासाठी काँग्रेस प्रांताध्यक्ष आ. नानाभाऊ पटोले यांच्या आदेशानुसार सिंधुदुर्ग जिल्ह्यात काँग्रेसचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते पूर्ण ताकदीनिशी आंदोलन करणार आहेत…
गुरुवार दि. 31 मार्च 2022 रोजी सकाळी 11:00 वाजता सर्व काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते आपापल्या घराबाहेर तसेच सार्वजनिक ठिकाणी गॅस सिलेंडर, दुचाकी वाहने (स्कूटर, मोटर सायकल) ला फुलांचा हार घालून आंदोलन करणार, तसेच ढोल, ताशा वाजवत केंद्र सरकारला जागे करण्यासाठी घोषणाबाजी करणार…. सोमवार दि. 4 एप्रिल 2022 रोजी सकाळी ठीक 11:00 वाजता जिल्हा कॉंग्रेसच्या वतीने मुख्यालय ओरोस येथे धरणे आंदोलन करण्यात येणार आहे…
केंद्रातील भाजप सरकारने लोकांना अच्छे दिनाची स्वप्न दाखवून गरीब शेतकरी व्यापारी सुशिक्षित बेकार यांना फसवण्याची काम केले आहे…. या केंद्रातील सरकारला जागे करण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसच्या वतीने काँग्रेस पक्ष पूर्ण ताकतीनिशी आंदोलन करणार…. या आंदोलनात काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी हे आंदोलन सिंधुदुर्ग जिल्ह्यात मोठ्या ताकदीनिशी करावे असे आवाहन काँग्रेस जिल्हाध्यक्ष चंद्रकांत उर्फ बाळा गावडे यांनी केले

प्रतिक्रिया व्यक्त करा

eight + 9 =