You are currently viewing जागतिक पर्यावरण वृक्षारोपण आणि ऑनलाईन व्याख्यानाचे आयोजन

जागतिक पर्यावरण वृक्षारोपण आणि ऑनलाईन व्याख्यानाचे आयोजन

वैभववाडी

५ जून ‘जागतिक पर्यावरण दिना’ च्या निमित्ताने ‘माउंटेनिअरिंग असोसिएशन सिंधुदुर्ग डिस्ट्रिक्ट’ संस्थेच्यावतीने कोरोनाच्या सर्व नियमांचे पालन करून वृक्षारोपण आणि ऑनलाइन व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे.
शनिवार दिनांक ५ जून रोजी माउंटेनिअरिंग असोसिएशन सिंधुदुर्ग डिस्ट्रिक्ट आणि निसर्ग मित्रपरिवार, तळेरे यांच्या संयुक्त विद्यमाने तळेरे येथील गांगेश्वर मंदिर देवराईमध्ये सकाळी ठीक ११ वाजता वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित केला. तसेच पर्यावरणाविषयी जागरूकता निर्माण व्हावी या उद्देशाने ‘पर्यावरण संवर्धनात आपली भूमिका’ या विषयावर मा.श्री. सुभाष पुराणिक, पांढरकवडा वन्यजीव विभागाचे विभागीय वन्यजीव अधिकारी यांचे रात्री ठीक आठ ते नऊ या वेळेत गूगल मिट ॲपवर ऑनलाईन व्याख्यान आयोजित केले आहे. सदर व्याख्यान ऐकण्यासाठी खालील लिंक वरून जॉईन होता येईल. अधिक माहितीसाठी संस्थेचे अध्यक्ष श्री. प्रकाश भाऊ नारकर (9168341644) व सचिव प्रा.श्री.एस.एन. पाटील (9834984411) यांच्याशी संपर्क साधावा असे संस्थेच्यावतीने आवाहन करण्यात आले आहे.

To join the meeting on Google Meet, click this link:
https://meet.google.com/igf-cwcv-hxg

Or open Meet and enter this code: igf-cwcv-hxg

प्रतिक्रिया व्यक्त करा

seventeen − 1 =