You are currently viewing शाॅर्ट सर्कीट मुळे मृत्यु झालेल्या विद्यार्थ्याच्या कुटुंबीयांना नुकसान भरपाई द्या, घरातील व्यक्तीला नोकरी द्या.

शाॅर्ट सर्कीट मुळे मृत्यु झालेल्या विद्यार्थ्याच्या कुटुंबीयांना नुकसान भरपाई द्या, घरातील व्यक्तीला नोकरी द्या.

मनसेची विद्युत वितरण कडे मागणी….

कुडाळ

कुडाळ येथील शाळकरी विद्यार्थी रघुनाथ रविंद्र मार्गी. या 15 वर्षीय मुलाचे अभ्यास करते वेळी खोली मध्ये शॅार्टसर्कीट होवुन घराला आग लागली या आगिमध्ये होरपळुन विदयार्थाचा मुत्यु झाला होता. सदर घटना 9/3/2022 रोजी विद्यार्थ्यांच्या रहात्या घरी घडली होती.. या घटने सबंधी आज जिल्हाध्यक्ष धीरज परब व प्रभारी तालुकाध्यक्ष सचिन सावंत यांच्या नेतृत्वाखालील मनसेच्या शिष्टमंडळाने अधिक्षक अभियंता, MSEB यांची भेट घेतली ,चर्चा केली व निवेदन सादर केले.. निवेदनात त्यांनी म्हटले आहे…
घटना अतिशय दुर्दैवी असुन आज त्या कुटुंबीयांनी एक व्यक्ती गमवली आहे. संबधीत कुटुंबीयांचे सात्वन करायला MSEB च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी जावुन भेटण्याचे सौजन्य ही दाखवले नाही. माणुसकी संपलेले हे अधिकारी लॅाकडाऊन मधील बिल भरणा करण्यासाठी गोरगरीब, सामान्य लोकांवर दबाव टाकताना आपली कार्यतत्परता दाखवताना दिसले . कनेक्शन कट करणार, बिल आताच भरा, पुर्ण रक्कमच भरा. उडवाउडवीची उत्तरे संर्रांस लोकांना देताना दिसले ..
या घटनेने संबधीत कुटुबीयांची मनुष्य व वित्तहानी झाली आहे. घटना हाय होलटेज व सिव्हर्स करंट, शॅार्ट सर्कीट या कारणामुळेच नुकसान झाल्याचे प्रथम दरर्शनि दिसून येते आहे. त्यामुळे संबधीत कुटुबीयांतील व्यक्तीला MSEB मध्ये नोकरी दयावी व मनुष्य आणि वित्तहानीची नुकसान भरपाई म्हणुन योग्य ती रक्कम कुटुबींयांनी दयावी. या दोन्ही गोष्टीतुन त्यांचे झालेले नुकसान नक्कीच भरुन येणार नाही. परंतु त्या कुटुबीयांना एक मदतीचा हात मिळेल. म्हणुन या मागणीचा तात्काळ सकारात्मक विचार करावा. अन्यथा आंदोलनाच्या पवित्रा घ्यावा लागेल..
या वेळी अधिक्षक अभियंता यांनी या बाबत चर्चा केली, व वरिष्ठ स्थरावर पत्रव्यवहार करु असे सांगीतले. या बाबत धीरज परब यांनी देखील स्पेशल केस म्हणून विचार करावा असे उर्जा मंत्र्यांना पत्र लिहून विनंती करणार असल्याचे सांगितले.. मनसे शिष्टमंडळात धीरज परब, सचिन सावंत यांच्या सह उप तालुकाध्यक्ष जगन्नाथ गावडे, माजी संपर्कअध्यक्ष हेमंत जाधव, सागर सावंत, सुबोध परब,दत्ताराम सावंत, महेश जाधव आदी सहभागी झाले होते. …

प्रतिक्रिया व्यक्त करा

one × 4 =