You are currently viewing मार्च महिन्याचा पगार सिंधुदुर्ग जिल्हा बॅकेने अँडव्हान्समध्ये द्यावा

मार्च महिन्याचा पगार सिंधुदुर्ग जिल्हा बॅकेने अँडव्हान्समध्ये द्यावा

शिक्षक भारतीच्या मागणीला बॅकेचा सकारात्मक प्रतिसाद

तळेरे:- प्रतिनिधी

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 90 टक्के पेक्षा जास्त माध्यमिक शिक्षकांची पगाराची खाती ही सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत आहेत. शासनाचे आर्थिक वर्ष मार्चला संपत असल्याने व शासकीय सर्व व्यवहार पूर्ण करावयाचे असल्याने शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी पगाराला विलंब प्रतिवर्ष होत असतो, फेब्रुवारी,व फेब्रुवारी या महिन्याचा पगार उशिरा होत असल्याने शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची आर्थिक कुचंबणा होते. मुलांची शैक्षणिक फी, इतर बँकांचे कर्ज त्याचे हप्ते व परतपेढ विलंब होत असल्याने त्यांना आर्थिक भुर्दंडाला सामोरे जावे लागते व मानसिक त्रास सहन करावा लागतो त्यामुळे यावर्षी आपल्या बँकेमार्फत शिक्षकांना मार्च 2022 च्या पगाराएवढी रक्कम ऍडव्हान्स स्वरूपात देण्यात यावी अशी मागणी शिक्षक भारतीचे जिल्हा अध्यक्ष संजय वेतुरेकर यांनी सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्षांना लेखी स्वरूपात केली होती.

निवेदन

जिल्हा बॅकेनेही याबाबत सकारात्मक प्रतिसाद देत अँडव्हान्स रक्कम देण्याची तयारी दर्शवली असल्याची माहिती जिल्हा अध्यक्ष संजय वेतुरेकर यांनी आमच्या प्रतिनिधीला दिली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा