You are currently viewing सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड येथील मूळ रहिवासी डोंबिवली मुंबई येथे राहणारा अक्षय मोगरकर आज उतरणार महाराष्ट्र श्री साठी

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड येथील मूळ रहिवासी डोंबिवली मुंबई येथे राहणारा अक्षय मोगरकर आज उतरणार महाराष्ट्र श्री साठी

दोन आठवड्यांनी होणाऱ्या भारत श्री साठी मिळाले नामांकन

सर्वसामान्य आर्थिक परिस्थितीमुळे येतायेत लढतींमध्ये अडथळे…दानशूर व्यक्तीकडून मदतीची अपेक्षा

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मूळ रहिवासी असलेला व सध्या डोंबिवली, मुंबई येथे वास्तव्यास असलेला अक्षय रवींद्र मोगरकर हा युवक आतापर्यंत मिस्टर इंडिया २०१६/१७, फेडरेशन कप २०१६/१७, मिस्टर महाराष्ट्र २०१६, मिस्टर ठाणे २०१६, इत्यादी बॉडीबिल्डर्स स्पर्धांमध्ये विजेता झालेला असून मिस्टर अशिया २०१८ स्पर्धेतही सिल्वर मेडल प्राप्त केलेले आहे. डोंबिवली येथे आपल्या आई-वडिलांसोबत राहत असलेला अक्षय पूर्वीपासूनच खडतर मेहनत घेत आहे. अक्षयचे वडील रवींद्र मोगरकर निवृत्त कर्मचारी असून आई चपाती भाजी केंद्र चालवते. बॉडीबिल्डिंग सारख्या स्पर्धा साठी प्रत्येक खेळाडूला आपली शारीरिक तंदुरुस्ती आणि रोजचा खुराक, भोजन यासाठी प्रचंड खर्च येत असतो. त्यामुळे सर्वसामान्य कुटुंबातील अक्षय मोगरकर अमोल मोठ्या स्पर्धांमध्ये खेळण्यासाठी तयार असूनही कोकणातील मुले आर्थिक दृष्ट्या मागे पडत आहेत. आजच अक्षय “महाराष्ट्र श्री” स्पर्धेमध्ये उतरणार असून दोन आठवड्यानंतर “भारत श्री” साठी सुद्धा त्याला नामांकन मिळाले आहे. मोठ्या स्पर्धांमध्ये विजयी होण्यासाठी प्रत्येक खेळाडूला मानसिक आणि शारीरिक दृष्ट्या कणखर व्हावं लागतं. परंतु या दोन्ही बाबींसाठी महत्त्वाचा असतो तो आर्थिक आधार आणि याच बाबतीत अक्षय मोगरकर मागे पडत आहे. प्रत्येक स्पर्धेत विजयी होण्याचा मानस असूनही सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कोकणचे हे रत्न कुठेतरी नावलौकिक मिळवतानाही आर्थिक पाठिंब्यामुळे अडचणीत येत आहे. जिल्ह्यातील व राज्यातील दानशूर व्यक्तींनी अक्षय मोगरकर याला आर्थिक पाठिंबा दिल्यास नक्कीच तो राज्याचेच नव्हे तर देशाचे नाव मोठे करेल यात तिळमात्र शंका नाही. अक्षयच्या भविष्यातील यशासाठी समाजातील दानशूर व्यक्तीना आवाहन करण्यात येत आहे की, खाली दिलेल्या बँक खात्यात शक्य तेवढी मदत करून भविष्यात अक्षयला देशासाठी खेळण्यासाठी आर्थिक भक्कम आधार द्यावा.

बँकेचा तपशील खालील प्रमाणे:-
अक्षय रवींद्र मोगरकर,
कॅनरा बँक, शाखा- डोंबिवली, मुंबई
खाते क्रमांक:- 1100 31 70 99 61
आय एफ एस सी कोड:- CNRB0000249

प्रतिक्रिया व्यक्त करा

three × five =