कुडाळ-ओरोस- मालवण सिंधुदुर्ग किल्ला असा प्रवास करत ढोल ताशांच्या गजरात वाजत गाजत मनसेची रॅली
हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मोत्सव आज तिथीप्रमाणे मनसेने धूमधडाक्यात साजरा केला. मुळात छत्रपती शिवाजी महाराजांचा उत्सव हा वर्षाचे 365 दिवस व्हावा अशी मनसेची भावना असून हिंदूधर्म चालीरीतीप्रमाणे ज्या पद्धतीने सर्व सण हे तिथीप्रमाणे साजरे केले जातात,अगदी त्याचप्रमाणे शिवजन्मोत्सव हा तिथी प्रमाणे साजरा व्हावा असे मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचे आदेश होते.त्याप्रमाणे मनसेच्या वतीने जल्लोषात शिवजन्मोत्सव साजरा करण्यात आला.कुडाळ पिंगुळी मनसे नाका पासून मनसेने बाईक रॅली काढत कुडाळ जिजामाता चौक येथे राजमाता आईसाहेब जिजाऊ व शिवाजीनगर येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून ओरोस सिंधुदुर्गनगरी येथे आगेकूच करण्यात आली. सिंधुदुर्गनगरी येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळा परिसरात मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी गर्दी करत घोषणांच्या जल्लोषात पुष्पहार अर्पण करून जणू आनंदोत्सव साजरा केला.तद्नंतर सिंधुदुर्ग किल्ला मालवण येथे रॅलीने आगेकूच करत कुंभारमाठ येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून मनसे पदाधिकऱ्यांनी ढोल-ताशांच्या गजरात वाजत-गाजत सिंधुदुर्ग किल्ल्याकडे प्रयाण केले. मनसेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिरात नतमस्तक होऊन आशीर्वाद घेतले व जनतेच्या प्रश्नांसाठी दिवस रात्र कटिबद्ध राहू अशी शपथ घेतली.यावेळी कुडाळ तालुकाध्यक्ष प्रसाद गावडे,मालवण विनोद सांडव,कणकवली दत्ताराम बिडवाडकर, उपजिल्हाध्यक्ष दया मेस्त्री, शैलेश अंधारी, माजी तालुकाध्यक्ष बाबल गावडे,सचिव राजेश टंगसाळी, विल्सन गिरकर, जिल्हा सचिव बाळा पावसकर, अमित इब्राहीमपुरकर, कुडाळ उपतालुकाध्यक्ष दिपक गावडे,अविनाश अणावकर,सत्यविजय कविटकर, विभाग अध्यक्ष सचिन ठाकूर,रामा सावंत,अनिल कसालकर,प्रमोद परब, सरपंच आपा मांजरेकर,सर्वेश राणे,गौरव कुडाळकर,वैभव धुरी यांसह असंख्य मनसे पदाधिकारी व महाराष्ट्र सैनिक उत्सवात सहभागी झाले होते.मनसे रॅलीच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्थेसाठी मोठ्या प्रमाणावर पोलीस फौजफाटा देखील तैनात करण्यात आला होता.