You are currently viewing विश्व कवी रवींद्रनाथ टागोर

विश्व कवी रवींद्रनाथ टागोर

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य कवी गीतकार गायक संगीतकार अरूण गांगल लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*“विश्व कवी रवींद्रनाथ टागोर”*

 

रवींद्रनाथ आहेत विश्व कवींद्रनाथ

काव्यसंग्रह भिजलेले सृष्टी भक्ती रसांतIIधृII

 

शुष्क डोह झालेल्या निर्झराला फुटे पाझर

कड्यावरून खडक फोडत सारं जीवन

कवितेला रविकिरणांचे होई स्पर्श स्पंदनII1II

 

रवींद्रनाथांनी सत्कर्म केली आयुष्यांत

साहित्यांतून समाजाला केले मार्गदर्शन

चैतन्य स्पर्शाने सर्वांसाठी अर्पिले जीवनII2II

 

*”गीतांजली”* काव्यसंग्रह नोबेल जगत मान्य

गीतांची ओंजळ ईश्वरास केली अर्पण

ईश सृष्टी देशभक्तीने भरली ओतप्रोतII3II

 

काव्य विशाल व्यापक विश्वाशी जोडी नातं

सर्वांवर केले प्रेम व्यक्त कवितेंतून

विश्वकर्मा कवी परमेश्वर आहे जाणितII4II

 

मांडलाय जीवन उत्सव विश्व निर्मात्यानं

आपण आलो आहोत होण्या संम्मिलीत

उत्सवात सामील व्हावे सर्वांना निमंत्रणII5II

 

अनेक काव्य लिहिली सरस्वती सुपुत्रानं

सर्वोत्तम अलंकार देण्याचा परमानंद

समर्पणाचे भाव आहेत नाथांचे कवितेतII6II

 

साहित्य जीवनावर प्रेम करावे शिकवण

शिक्षित व्हावा समाज देशभक्तीने प्रेरित

*”शांतीनिकेतन”* देई प्रेरणा जगण्याचे चैतन्यII7II

 

श्री अरुण गांगल कर्जत रायगड महाराष्ट्र.

पिन.410201.Cell.9373811677.

प्रतिक्रिया व्यक्त करा