You are currently viewing येवा कोकण आपलाच आसा..

येवा कोकण आपलाच आसा..

ग्रामसेवक ग्रामपंचायत वरचीगुरामवाडी ता.मालवण येथे कार्यरत कविता व इतर सामाजिक विषयांवर लिखाणाची आवड

 

*येवा कोकण आपलाच आसा*

▪️ पेज आणि वालीची भाजी

पिठी नी भात

सुकाट आणि भाकरी

▪️काळ्या वाठाण्याच सांबारा

वडे नी सागोती

▪️तवशाचा खसखसा

घावणे आणि पोळये

मालपे नी खांन्टोळे

येवा कोकण आपलोच आसा

येवा कोंकण आपलोच आसा

▪️ उकडो भात ,माशाचा सार

तिकटी डाळ भाजलेलो बांगडो

तिसरे लाळये मुळे

सुमद्रातले सुळे

येवा कोकण आपलाच आसा

येवा कोकण आपलाच आसा

▪️फणसाची भाजी

ओले काजी

जांभळा नी करदा

चिंचेचा कोगाल

हापूस आंबो नी मक्याची बोंडा

येवा कोकण आपलाच आसा

येवा कोकण आपल़ाच आसा

▪️मालवणी खाजा बंगाली ताजा

खडखडे नी चुरमु-याच्या लाडू

▪️वरण्याचे शेंगो,चवळेचो पालो

कोकणात फेमस

▪️कलीगणाचो दयकालो

▪️ उडीद,कुळीथ

चवळी नी फजाव

▪️आबोलेची फुला , सुरंगाचो वळेसार

देवाक घालतत गोंड्याचा हार

बावडेतला पाणी थंडगार

बावडेतला पाणी थंडगार

येवा कोकण आपलोच आसा

येवा कोकण आपलोच आसा

 

*लक्ष्मण उर्फ प्रकाश समळकर✍️*

ग्रामसेवक ग्रामपंचायत वरचीगुरामवाडी ता.मालवण

95450 06839

प्रतिक्रिया व्यक्त करा