You are currently viewing चवथी माळ

चवथी माळ

श्री कुंष्मान्डा देवी

 

सुरा संपुर्ण कलश रुधिराप्ल्यू तमेव चं l दधाना हस्त पद्माभ्याम कुंष्मान्डा शुभ दास्तु में ll

नवरात्रीच्या चवथ्या दिवशी श्री कुष्मा न्डा मातेची पूजा केली जाते. यां दिवशी जे साधक उपासना करतात त्यांचे मन अनाहत चक्रा मध्ये प्रवेश करते. यां दिवशी अत्यंत पवित्र आणि अचंचल मनाने देवीचे ध्यान करून पूजन करावे

ज्यावेळी सृष्टी अस्तित्वात नव्हती, त्या वेळी हया देवीने सृष्टी निर्माण केली. त्या मुळे यां देवीला आद्यशक्ती व सृष्टीची आदिदेवता मानले जाते. सूर्यमंडळाच्या आत ही देवी निवास करते. सूर्यमंडळात निवास करण्याची शक्ती आणि क्षमता फक्त यां देवीतच आहें. देवींची कांती आणि प्रभा सूर्याप्रमाणेच दैदीप्यमान आहें. देवीच्या तेजमुळे सर्व दिशा उजळून निघतात. यां ब्रह्माण्डतील प्रत्येक वस्तू व प्रत्येक प्राणी मात्रास देवीचेच तेज लाभले आहें असे मानले जाते.

श्री कुंष्मान्डा देवी ही अष्टभुजा देवी आहें. तिच्या प्रत्येक हातात अनुक्रमे, कमंडलू, धनुष्यबाण, कमळ, अमृतकलश, गदा, चक्र, आहेत आणि आठव्या हातात सर्व सिद्धी आणि निधी देणारी जपमाळ आहें. देवीचे वाहन वाघ आहें.

यां देवींची उपासना करणारे भक्त रोग मुक्त होतात. देवी भक्तांना आयुष्य, बल, आरोग्य, यश प्रदान करते. देवी चे नैवेदयाला दही, शिरा,सुकामेवा असे पदार्थ द्यायचा प्रघात आहें. श्री कुंष्माण्डl देवीचे मोठे मंदिर पिपरा माफ, महोबा उत्तर प्रदेशात आहें.

 

आजचा रंग पिवळा

कल्पना तेंडुलकर

ओरोस.

प्रतिक्रिया व्यक्त करा