सुक्यो गजाली . . .
चराब उतारली . . . !

सुक्यो गजाली . . .

चराब उतारली . . . !

आबा बॅचलर असतांनाची गजाल. सरकारी नोकरी. रवाक ब्लॉक. रात्री घेवक ऑफिसातले पंटर. ‘खा-प्या-मजा करा’ चा जीवन जगा होतो. ‘आधीच रेटलोबा त्यात मद्य प्याला’ म्हतल्यार आणखी काय जातला. प्वॉट सुटला, गोरे गाल गुलाबी दिसाक लागले. टाचणी टोचून काडी पेटवन धरली तर भाक्कन पेटतलो कापरासारखो, अशी चेष्टा पेद्रु आणि नंदू करुक लागलो.

एकदा आबाक खूप त्रास होवक लागलो, छातीत दुखाक लागला. डॉक्टरान ‘हायपर टेंन्शन’ सांगल्यान. रोज तीन-चार मैल चलाक, धावाक सांगल्यान. त्याच दिवशी आबान पेपरात जायरात वाचल्यान, ‘महिनाभरात तीन इंच चरबी उतरवू, हमखास पोट खपाटीस नेऊ!’ आबान फोन करुन नावनोंदणी केल्यान. रात्री न घेता निजलो.

फाटफटेक उठान आबा, त्या कंपनीच्या फोनाची वाट बघीत बसलो. बरोब्बर सहाच्या ठोक्याक दारार टकटक झाली. आबान दार उघडल्यान. समोर याक सुंदर, गोरापान, तरुण पोरग्या, हाफ पॅंटीर!

‘चला, पकडा माका!’ म्हतल्यान आणि पळत सुटला. आबा तेच्या पाठसून धावत सुटलो. ती चवळीची शेंग ह्या बटाट्याक गावता? आबा हरमाळलो आणि घराक गेलो. दुस-या दिवशी फाटेक परत टकटक. ताच पोरग्या, तोच संवाद. आबा धाव धाव धावलो, हासड घालीत घराक परातलो! तिस-याय दिवशी तोच प्रकार. पकडा पकडी सुरुच. ती सुंदरी काय आबाच्या हातीक लागाना. आठवडो उलाटलो तशी आबाची आशा वाढत गेली, स्पीडय वाढलली. चौदाव्या दिवशी पोरग्या खूपच आवाक्यात इला.

पंधरावो दिवस, आबाचो वेष बदाललो, लेंगो जावन हाफ पॅंट इल्ली, पायात स्पोर्टस शूज! आज तेका नक्की पकडतलय, हेची आबाक खात्रीच होती. ठरल्याप्रमाणे सहाच्या ठोक्याक दार वाजला, आबान दार उघडला. भायर एक हिडींबा उभी, ‘चल, धाव जोरात, नायतर मी तुका पकडतलय. बिचारो आबा! नंतरचो पंधरवडोभर जिवाच्या आकांतान पळा होतो. महिनाभरात प्वॉट खराच खपाटिक गेला. सगळी चरबी उतारली!

उडाणटप्पू

aryamadhur.

प्रतिक्रिया व्यक्त करा