You are currently viewing आठवण…मुंबईतील गजाल..!

आठवण…मुंबईतील गजाल..!

मुंबईत डेगवे ग्रामस्थ हितवर्धक संघाची ची स्थापना …!

तत्कालीन रत्नागिरी जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यातील” डेगवे” गावचे चाकरमानी मुंबईत कामधंदा निमित्त आले .हाताला काम मिळाल्याने ते मुंबईत एकत्र आले. ते 1949 साल होते.आपल्या देशाला नुकतेच स्वातंत्र्य मिळवून सर्वत्र चैतन्य पसरले होते. विकासाचे वारे वाहत होते .आपल्या “डेगवे” गावाचा पर्यायाने देशाचा विकास केला पाहिजे अशी उर्मी त्यांच्या मनात उसळत होती. आपल्या गावच्या बरोबर आपली थोर व उज्वल परंपरा टिकवली पाहिजे या जिद्दीने आमच्या “डेगवे” गावच्या मुंबईतील केवळ वीस-पंचवीस तरुणांनी एकत्र येऊन स्वर्गीय शांताराम शिवराम देसाई (फणसवाडी) यांच्या नेतृत्वाखाली व मार्गदर्शनाखाली “डेगवे ग्रामस्थ हितवर्धक संघ, मुंबई “या संस्थेची स्थापना केली. व 1953 मध्ये मुंबई विश्वस्त कायद्याअन्वये नोंदवून गेली 72 वर्ष गावाच्या शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक विकासासाठी सदर संस्था स्थानिक ग्रामस्थांच्या सहकार्याने झटत आहे
.सन् 1949 साला पूर्वी आमच्या गावाचे स्वरूप वेगळे होते.गावातील शेतकरी पूर्वापार पद्धतीने शेती व इतर व्यवसाय पारंपरिक करीत होते. एका ठराविक चाकोरीतून ग्रामीण जीवन चालू होते .इयत्ता चौथी पर्यंत प्राथमिक शिक्षण देणारी शाळा मंदिरात चालू होती .इंग्रजी शिक्षणासाठी शेजारच्या “बांदा” या गावी जावे लागत होते. शासन नुकतेच कुठे विकास योजना आखीत होते. अशा वेळी डेगवे गावातील मुंबईस्थित ग्रामस्थ संघटित होऊन ;ज्या मातीत जन्मलो; ज्या समाजात वाढलो, त्या मातीची त्या समाजाची सेवा करणे; ही जीवननिष्ठा मानून कार्याला सुरुवात केली. संस्थेच्या त्या वेळेच्या तळमळीच्या व निष्ठावंत कार्यकर्त्यांनी वेळोवेळी गावी जाऊन स्थानिक जनतेची एकजूट केली. देशात व इतरत्र काय चाललेले आहे. याची माहिती दिली. वर्तमानपत्रातून प्रसिद्ध होणारी ग्रामीण विकासाची माहिती संग्रहित करून ती त्यांच्यापुढे ठेवण्यात आली. शेतीची सुधारलेली पद्धती तत्कालीन संस्थेच्या कार्यकत्यांनी समजावून सांगितली .
आपला विकास आपणच केला पाहिजे याची जाणीव करून समाजाला दिली. पुढे गावाचा जो विकास झाला त्याची पार्श्वभूमी अशाप्रकारे तयार केली. स्थानिक ग्रामस्थांची सन 1954 साली संघटना करून “डेगवे ग्रामोत्कर्ष मंडळ, डेगवे “नावाचे मंडळ स्थापन केले. पुढे ग्रामपंचायत स्थापन झाली .व नंतर सहकारी सोसायटी आली. विकासाला चालना मिळाली.  संस्थेने आपले कार्य अधिकच जोमाने चालू ठेवले. गावात वीज आली. रस्ते झाले.  भाताच्या गिरण्या सुरू झाल्या. शेतकऱ्यांनी नवा दृष्टिकोन ठेवून शेती केली. नारळ-पोफळीच्या बागा उठू लागल्या. गावाची प्रगती या दृष्टीने सुरू झाली. हे नमूद करायला सांप्रत कार्यकारी मंडळाला आनंद होत आहे.
“डेगवे ग्रामस्थ हितवर्धक संघाची मुंबई” या संस्थेची 15 ऑगस्ट 1949 आली स्थापना करण्यात आली. त्या संस्थेचे पहिले व संस्थापकीय कार्यकारी मंडळ खालील प्रमाणे होते. त्याचा आम्हाला सार्थ अभिमान वाटतो आहे. त्यांची प्रेरणा व शिदोरीवर मा.अध्यक्ष स्व.दत्ताराम अर्जुन देसाई, (आंबेखणवाडी ) बरीच वर्षे अध्यक्षपदाची यशस्वी पणे संस्थेची धुरा संभाळली. त्या नंतर श्री.शंभा दत्ताराम देसाई, ( मोयझर वाडी ) वामन पांडुरंग देसाई, (फणसवाडी ) रामचंद्र यशवंत देसाई, लुमाजी बाबाजी देसाई, स्व.श्री.बाबुराव चुडे देसाई (मोयझर वाडी) यांच्या अध्यक्षतेखाली व आता गेली १२वर्षे डेगवे गावचे सुपुत्र व मा.आमदार  गुरूनाथजी देसाई (बाजारवाडी )यांच्या मार्गदर्शनाखाली व नेतृत्वाखाली आजपर्यंत संस्था अखंडपणे कार्य करीत आहे. त्याचा सांप्रत कार्यकारी मंडळाला व सभासदांना सार्थ अभिमान आहे .
संस्थेचे तत्कालीन पहिले संस्थापक व नोंदणीकृत कार्यकारी मंडळ खालील प्रमाणे होते.
१) अध्यक्ष : स्व भीमसेन राजाराम देसाई (मोयझरवाडी) २)उपाध्यक्ष :स्व श्री कृष्णा सखाराम देसाई (बाजारवाडी) ३)चिटणीस : स्व.श्री शांताराम शिवराम देसाई (फणस वाडी) ४) दुय्यम चिटणीस: स्व.श्री सखाराम विठ्ठल देसाई (मोयझरवाडी) ५)खजिनदार:स्व. श्री काशीराम सिताराम देसाई (मोयझरवाडी) ६)दुय्यम खजिनदार:स्व. श्री भिसाजी गंगाराम देसाई (आंबे खंड वाडी)
: कार्यकारी मंडळ :
७)स्व. श्री कृष्णा बाबली देसाई (आंबेखणवाडी)
८)स्व. श्री बाबाजी भानू तथा झिलु देसाई (आंबेखंण वाडी)
९) स्व. श्री तुकाराम जयराम देसाई( मोयझरवाडी)
१०) स्व. श्री कृष्‍णा गंगाराम देसाई.(मोयझर वाडी)
११) स्व. श्री दत्‍ताराम शंकर देसाई (जांभळवाडी)
१२) स्व .श्री रामचंद्र भगवान मेस्त्री (जांभळवाडी)
१३) हिशोब तपासणी :
स्व.श्री शंकर बाबाजी पडवळ (बाजारवाडी)
हे संस्थेचे पहिले संस्थापक व नोंदणीकृत कार्यकारी मंडळ होते. शिवाय या सोबत फोटोत दर्शविलेले सर्व सभासद यांनी ही संस्था गावाच्या विकासासाठी स्थापन केली आहे. त्यामुळे संस्था स्थापन करण्यास सहकार्य करणाऱ्या सर्व ज्ञात-अज्ञात सभासद ग्रामस्थांना आमचा मानाचा मुजरा आहे. त्यांनी गावाच्या विकासासाठी दाखवलेला मार्ग आम्ही अव्याहतपणे संभाळला आहे. त्यांची कार्य करण्याची स्फूर्ती आम्हाला मिळाली हे आम्ही आमचे भाग्य समजतो आहे.
गेली 72 वर्ष गावाचे कार्य आपणा सर्वांच्या सहकार्याने व मार्गदर्शनाने चालू ठेवण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे. त्याला गावातील सर्व जनतेने सहकार्य करून साथ द्यावी; अशी आमची कळकळीची विनंती आहे. संस्थेच्या पहिल्या व नोंदणीकृत कार्यकारी मंडळाला व दिवंगत संस्थेच्या सभासदानां आमचा लाख लाख सलाम आहे.
शिवाय आजच्या युवा पिढीला संस्थेचे सभासद होऊन विधायक उपक्रम राबविण्यास आवाहन करीत आहोत.

✍️उल्हास बाबाजी देसाई.
सरचिटणीस,डेगवे ग्रामस्थ हितवर्धक संघ,मुंबई

प्रतिक्रिया व्यक्त करा

12 + seven =