पंतप्रधान जनकल्याणकारी योजना अभियानच्या सावंतवाडी तालुका अध्यक्षपदी मंगलदास देसाई यांची निवड

पंतप्रधान जनकल्याणकारी योजना अभियानच्या सावंतवाडी तालुका अध्यक्षपदी मंगलदास देसाई यांची निवड

बांदा

पंतप्रधान जनकल्याणकारी योजना कोकण प्रांत, विभागाच्या प्रचार व प्रसार पदी सावंतवाडी तालुकाध्यक्ष म्हणून डेगवे गावचे सुपुत्र तथा माजी सरपंच श्री मंगलदास नागबा देसाई यांची निवड नुकतीच झाली आहे. त्यामुळे त्यांनी डेगवे ग्रामदेवता श्री माऊली पंचायत देवता, तसेच ४८ खेड्यांचा श्री स्थापेश्वर, महालक्ष्मी मंदिरात जाऊन देवतांना श्रीफळ ठेवून दर्शन घेतले.
त्यावेळी सर्वश्री उत्तम देसाई, सरपंचा सौ.वैदेही देसाई, डेगवे ग्रामस्थ हितवर्धक संघाचे सरचिटणीस उल्हास देसाई, सोसायटीचे माजी चेअरमन सुनील देसाई, चंद्रकांत देसाई, डेगवे ग्रामपंचायतीचे सदस्य बाळकृष्ण देसाई, वैशाली देसाई, शामसुंदर देसाई, ग्रामस्थ फटूजी देसाई, महादेव परब, सौ.केसरकर, आंबेरकर, सुतार, राजेश देसाई, दादा देसाई वैगरे ग्रामस्थ उपस्थित होते. त्यावेळी मंगलदास देसाई याचा शाल, श्रीफळ,पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

प्रतिक्रिया व्यक्त करा