माजी खासदार तथा भाजपा महाराष्ट्र प्रदेश सचिव निलेश राणे यांचा आज वाढदिवस. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तरुण खासदार म्हणून देशाच्या संसदेत गेलेले माजी खासदार निलेश राणे म्हणजे तरुणाईच्या गळ्यातील ताईत. आपल्या बेधडक वक्तव्यामुळे निलेश राणे नेहमीच चर्चेत असतात. कोकणातील प्रश्नांची उत्तम जाण असलेले निलेश राणे यांचा गावागावातील कार्यकर्त्यांशी त्यांचा दांडगा संपर्क आहे, त्यामुळे निलेश राणे दौऱ्यावर आले की त्यांच्या भोवती तरुण कार्यकर्त्यांचा सर्वात जास्त गोतावळा असतो.
आपल्यावर प्रेम करणाऱ्या नेत्यांच्याच नव्हे तर सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या मदतीला देखील दिवसारात्री कधीही धावून जाण्याची निलेश राणे यांची वृत्ती, त्यामुळे त्यांच्यावर कार्यकर्त्यांचा विश्वास देखील जास्त. कोकणातील प्रश्न त्यांनी हिरहिरीने संसदेत मांडून अनेक प्रश्नांना वाचा फोडली होती. कोकणाच्या विकासासाठी नेहमीच ते अग्रेसर असतात. संसदेत अभ्यासू भाषण करत कोकणातील सर्वात जास्त प्रश्न संसदेत मांडण्यात ते आघाडीवर होते. खासदार नारायण राणे यांच्या पावलावर पाऊल ठेवत राजकारणात तर ते यशस्वी झालेतच परंतु समाजकारणातही ते पुढे असतात.
निलेश राणे यांचा जनसंपर्क दांडगा आहे, तसेच पक्षाच्या वरिष्ठ पातळीवर देखील त्यांना मान आहे त्यामुळे जिल्ह्यातील कोणतेही काम वरिष्ठ पातळीवरून करून घेण्याची त्यांची ताकद आहे. समाजकार्यात ते कधीही मागे राहिले नाहीत. जनतेने आजवर दिलेल्या प्रेमाखातर ते सदैव जनतेसाठी लढायला तयार असतात. त्यांच्या अभ्यासू आणि कणखर भूमिकेमुळे ते नेहमीच प्रकाशझोतात असतात. खासदार नारायण राणे आणि आमदार बंधू नितेश राणे यांच्या अटकेच्या वेळी एक मोठा मुलगा आणि मोठा भाऊ म्हणून पोलीस यंत्रणांशी अगदी दोन हात करायलाही मागे पुढे न पाहता झगडणारे निलेश राणे पाहिले की त्यांच्या हृदयात आपल्या कुटुंबाबद्दल असलेली माया, प्रेम प्रकर्षाने दिसून येतं आणि वरवर कठोर दिसणारं एक रूप आणि आतून मृदू असणारं हृदय यांचं दर्शन घडतं. भविष्यात राजकारणात त्यांना मोठी जबाबदारी मिळो आणि राजकीय वाटचाल यशस्वी होवो अशाच संवाद मिडियाकडून शुभेच्छा