जिल्ह्यातील माजी सैनिक, माजी सैनिक विधवा पत्नी यांनी ऑनलाईन नोंदणी करण्याचे आवाहन
सिंधुदुर्गनगरी
जिल्ह्यातील सर्व सेवानिवृत्त अधिकारी, माजी सैनिक, माजी सैनिक विधवा पत्नी, वीरनारी, वीरमाता, वीरपिता यांनी सैनिक कल्याण विभाग, महाराष्ट्र राज्य पुणे यांनी दिलेल्या www.mahasainik.maharashtra.gov.in या संकेस्थळावर नोंदणी करण्याचे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी केले आहे.
तसेच नोंदणी केल्यानंतर त्याबाबतचा फॉर्म प्रत्यक्ष येऊन जिल्हा सैनिक कार्यालय, सिंधुदुर्ग येथे जमा करुन त्याबाबतची खात्री करावी.
सैनिक कल्याण विभाग महाराष्ट्र राज्य पुणे यांनी दिलेल्या निर्देशानुसार राज्यातील विविध जिल्हा जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयातून माजी सैनिक, माजी सैनिक विधवा पत्नी यांना देण्यात येणाऱ्या विविध आर्थिक मदती व इतर कामकाज हे दिनांक 1 एप्रिल 2025 पासून ऑनलाईन पध्दीने सुरु करण्यात येणार आहे. अधिक माहितीसाठी दूरध्वनी क्र. 02362 228820,9322051284 वर संपर्क करावा.