You are currently viewing खासदारांकडून भोमवाडीच्या नवनिर्वाचित सरपंचांना शुभेच्छा…

खासदारांकडून भोमवाडीच्या नवनिर्वाचित सरपंचांना शुभेच्छा…

सावंतवाडी

भोमवाडी ग्रामपंचायतच्या नवनिर्वाचित सरपंचा सौ.अनुराधा वराडकर यांना आज खासदार विनायक राऊत यांनी शुभेच्छा दिल्या. आगामी काळात गावात जास्तीत-जास्त विकास कामे करण्यासाठी भरघोस निधी उपलब्ध करून देण्याची ग्वाही दिली. शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी आज सौ. वराडकर यांची भेट घेतली. यावेळी तालुका प्रमुख रुपेश राऊळ, बाळा गावडे, उपजिल्हाप्रमुख चंद्रकांत कासार, जिल्हा परिषद सदस्य राजन मुळीक, उपतालुकाप्रमुख आबा सावंत, सुनील प्रभुआजगावकर, शेखर प्रभुआजगावकर, श्रीपाद वेंगुर्लेकर, उमेश बाळे, दीपक बाळे, आलेलीय फर्नाडिस, सुनील खोत, झीलु खोत, सफल प्रभुआजगावकर,गोपाळ मसुरकर, राजन फेंद्रे, सदस्य रश्मी राजन फेंद्रे, मधु वराडकर आदी पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा