You are currently viewing चोरांचा बंदोबस्त करा : भाजपाचे देवगड पोलिसांना निवेदन

चोरांचा बंदोबस्त करा : भाजपाचे देवगड पोलिसांना निवेदन

देवगड

देवगड जामसंडे शहरातील वाढत्या चोर्‍यांचे प्रमाण लक्षात घेता स्थानिक व्यापारी व नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. या दुकान फोडी चोरीचा तपास करून आरोपींना गजाआड करावे. व व्यापारी व नागरिकांना भयमुक्त करावे अशी मागणी देवगड तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने पोलीस निरीक्षक यांच्याकडे लेखी पत्राद्वारे करण्यात आली आहे .

त्यावेळी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष बाळ खडपे, महिला तालुकाध्यक्ष उषकला केळुसकर,शहराध्यक्ष योगेश पाटकर, महिला अध्यक्षा तन्वी शिंदे, नगरपंचायत गटनेते नगरसेवक शरद ठुकरूल, नगरसेविका सौ प्रणाली माने माजी नगराध्यक्षा प्रियांका साळसकर,माजी उपनगराध्यक्ष राजेंद्र वालकर, मिलिंद माने, यश रानडे, नरेंद्र भाबल,अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा