You are currently viewing द्वारका दूध व्यवसायिक संस्था दूध डेरीचे सतीश सावंत यांच्या हस्ते उद्घाटन..

द्वारका दूध व्यवसायिक संस्था दूध डेरीचे सतीश सावंत यांच्या हस्ते उद्घाटन..

हरकुळ बुद्रुक येथे द्वारका सहकारी दूध व्यवसायिक संस्थेचे उद्घाटन आज सकाळी माजी जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांच्या हस्ते फीत कापून करण्यात लागते.

सिंधुदुर्गातील दूध उत्पादक शेतकरी हे कोल्हापूर येथील दूध डेअरी मध्ये दुध पाठवतात. पण त्यासाठी दुधाचे संकलन करावे लागते. ते संकलन या द्वारका डेअरीच्या माध्यमातून हरकुळ बुद्रुक व आजूबाजूच्या गावांमधील दूध संकलन या डेरी मध्ये करण्यात येणार असल्याची माहिती माजी जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांनी दिली.

या उद्घाटन कार्यक्रमात दूध सोसायटी मुख्यप्रवर्तक सुनिल वाळके विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन डॉ अनिल ठाकूर जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा सदस्य तथा माजी सरपंच हरकुळ बुद्रुक आनंद ठाकूर, माजी उपसभापती बुलंद पटेल, माजी उपसरपंच राजू पेडणेकर, सोसायटी संचालक नित्यानंद चिंदरकर, लियाकत पटेल, बाबूल पटेल, सुनील वाळके, दूध उत्पादक शेतकरी चंदू सापळे, मनोहर कुंकेरकर, तात्या वाळके, वामन गोसावी गावातील दूध उत्पादक शेतकरी व ग्रामस्थ उपस्थित होते.

शेतकऱ्यांच्या दुधाला बाजारामध्ये चांगला भाव मिळावा यासाठी माजी जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांनी वेळोवेळी प्रयत्न केले आहेत. हरकुळ बुद्रुक येथे हि द्वारका सहकारी दूध व्यवसायिक संस्थेच्या माध्यमातून हरकुळ बुद्रुक व आजूबाजूच्या गावांमधील दूध उत्पादक शेतकऱ्यांचे दूध या डेरी मध्ये संकलन करण्यात येणार आहे.

हे दूध कोल्हापूर येथील गोकुळ दूध डेरीला पाठवण्यात येईल जेणेकरून सिंधुदुर्गातील दूध उत्पादक शेतकऱ्यांची आर्थिक उन्नती होईल व भरभराटी होईल. यासाठी या द्वारका सहकारी दूध व्यावसायिक संस्था सुरू करण्यात आली असल्याचे दूध सोसायटी मुख्यप्रवर्तक सुनिल वाळके यांनी सांगितले.

प्रतिक्रिया व्यक्त करा