You are currently viewing बेळणे पावणादेवी मंदिरापर्यंत रस्त्यासाठी निधी द्या

बेळणे पावणादेवी मंदिरापर्यंत रस्त्यासाठी निधी द्या

सरपंच, उपसरपंच यांची आमदार नितेश राणेंकडे मागणी

कणकवली

मुंबई गोवा हायवेपासून बेळणे पावणादेवी मंदिर पर्यंत च्या रस्त्यासाठी स्थानिक विकास कार्यक्रमांतर्गत निधी देण्याची मागणी बेळणे सरपंच दिक्षा चाळके यांनी आमदार नितेश राणे यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे. बेळणे गावचे ग्रामदैवत असलेल्या पावणाई मंदिरापर्यंत डांबरी रस्ता होण्यासाठीचा परिपूर्ण प्रस्ताव बेळणे ग्रामपंचायत मार्फत वरिष्ठ स्तरावर प्रशासनाकडे पाठविण्यात येणार आहे. हा रस्ता झाल्यानंतर बेळणे वासीयांना मुंबई गोवा हायवेवरून थेट ग्रामदैवत पावणाई मंदिरापर्यंत आपली वाहने घेऊन जाता येणे शक्य होणार आहे. ग्रामस्थांच्या सोयीसाठी हा रस्ता होणे अत्यावश्यक आहे. यासाठीच बेळणे सरपंच दिक्षा चाळके , उपसरपंच दिलीप तांबे यांनी आमदार नितेश राणे यांच्या स्थानिक विकास कार्यक्रमांतर्गत निधी देण्याची मागणी केली आहे. आमदार नितेश राणे यांनी त्वरित या रस्त्यासाठी निधी देण्याचे मान्य केले आहे. यावेळी ग्रामस्थ सत्यवान चाळके, विष्णू चाळके, दीपक चाळके आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

13 − nine =