You are currently viewing अंगणवाडीचे मानधन वाढेपर्यंत लढा चालूच राहील; कमलताई परुळेकर

अंगणवाडीचे मानधन वाढेपर्यंत लढा चालूच राहील; कमलताई परुळेकर

सिंधुदुर्ग

महाराष्ट्रभर २३तारखेपासून अंगणवाडी कर्मचारी प्रकल्प,जिल्हा व जिल्हाधिकारी कार्यालयासमोर याठिकाणी वेगवेगळी आंदोलने करीत आहेत.त्यांची मागणी मानधन वाढ, पेन्शन, नवीन मोबाईल ही प्रामुख्याने होती.अर्थमंत्र्यांनी फक्त मोबाईल देणे साठी तरतूद केली.व डीपीडीसीचा ३टक्के निधी महिला व बालकल्याणला दिला.बाकीच्या मागण्यांना अक्षता लावल्या. राज्य सरकारने २०१५ ला व केंद्राने २०१७ला वाढ दिली, त्यानंतर महागाई ५पटीने वाढली.इतर अनेक राज्यांत केरळ , तामीळनाडू, दिल्ली, हरीयाना, तेलंगणा इ.ठिकाणी मानधन वाढले,पण पुरोगामी महाराष्ट्रातच कमी मानधनावर अंगणवाडी कर्मचाऱ्याना वापरुन घेतले जाते हे दुर्दैवी आहे असे कमलताई परुळेकर म्हणाल्या.

या सरकारविरोधात संताप मोर्चा मुंबईत आझाद मैदानावर काढायचे अंगणवाडी कृती समितीने ठरविले आहे.सरकारने भेटीची संधी देऊन पुरवणी मागण्यात मानधन वाढ व पेन्शन बाबत निर्णय करावा आणि पूर्वीचे पेन्शनची हजारो प्रकरणे पेंडींग आहेत,त्यासाठीही निधीची तरतूद करावी अशी आमची मागणी सरकारकडे आहे.सरकारने जर आम्हाला ठेंगा दाखवला तर २८ आणि २९मार्चला जिल्हा पातळीवर मोर्चे,जेलभरो,सत्याग्रह इ.आंदोलनांचे आयोजन केल्याचे त्यांनी सांगीतले.

महाविकास आघाडीला किमान समान कार्यक्रमाचा ही विसर कसा पडू शकतो? त्यात त्यांनी अंगणवाडीचे मानधन वाढविणार व इतर सुविधा देणार असे म्हटले होते.गावात कुठलीही मोहीम आली की ती अंगणवाडी वर सोपवून प्रशासन रिकामे होते.यापुढे हे चालू देणार नाही.असा इशारा अंगणवाडी कर्मचारी सभेच्या नेत्या कमलताई परूळेकर यांनी दिला आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

thirteen − one =