You are currently viewing तळेरे हायस्कूल मध्ये जागतिक महिला दिन उत्साहात साजरा

तळेरे हायस्कूल मध्ये जागतिक महिला दिन उत्साहात साजरा

महिलांना सन्माननीय वागणूक द्या. आजची महिला विविध क्षेत्रात अग्रेसर* – डाॕ मनिषा नारकर

वामनराव महाडीक माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय,तळेरे येथे आज जागतिक महिला दिन उत्साहात साजरा झाला. महिलांना त्यांच्या हक्कांची जाणीव व्हावी,त्यांचे जीवन सुधारावे यासाठी आठ मार्चला जागतिक महिला दिन साजरा केला जातो. आज महिला चौकटी बाहेर पडून जगाला गवसणी घालत आहेत. खेळापासून मनोरंजनापर्यंत, राजकारण, लष्कर ,संरक्षण मंत्रालयापर्यंत विविध मोठ्या भूमिका बजावत आहेत. त्यामुळे त्यांच्या कामाची दखल आपण स्थानिक पातळीवर घेणे फार महत्त्वाचे आहे आणि याच संकल्पनेतून तळेरे हायस्कूल मध्ये कोरोना नियमांचे पालन करत महिला दिन साजरा करण्यात आला. वृक्षांचे संगोपन संरक्षण व महत्त्व या गोष्टींचा विचार करून कार्यक्रमाची सुरुवात रोपट्याला पाणी घालून करण्यात आली.यावेळी तळेरे पंचक्रोशीतील प्रसिद्ध डॉ. मनीषा नारकर प्रमुख पाहुण्या म्हणून लाभल्या. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रशालेचे मुख्याध्यापक एस.जी. नलगे, ए.एस. मांजरेकर,सांस्कृतिक विभाग प्रमुख ए.बी.कानकेकर, सी.व्ही. काटे,डी.सी.तळेकर,एन. बी. तडवी, पी.एम.पाटील,पी. एन. कानेकर,ए.पी. कोकरे,व्ही. टाकळे,व्ही.व्ही.केसरकर,एन.पी. गावठे, ए.बी. तांबे, रूपाली चव्हाण,अक्षता चव्हाण,शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी आदी उपस्थित होते. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते शालेय पोषण आहार करणाऱ्या महिला रूपाली चव्हाण,अक्षता चव्हाण यांचा सत्कार करण्यात आला तसेच प्रशालेतील सर्व शिक्षिका यांना एक- एक रोपटे देऊन त्यांचाही याप्रसंगी सन्मान करण्यात आला.डॉ. नारकर म्हणाल्या महिलांना सन्माननीय वागणूक द्या. आजच्या महिला विविध क्षेत्रात अग्रेसर आहेत . तसेच प्रत्येकाने आपल्या दिसण्यावर नाही तर आपण असण्यावर जास्त भर दिला पाहिजे, त्यासाठी आरोग्यविषयक माहितीचे मूलमंत्र त्यांनी उपस्थितांना दिले. सर्वांना महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या.प्रशालेच्या विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतातून स्त्रीला अभिवादन केले. प्रशालेचे मुख्या. एस.जी.नलगे, ए.एस. मांजरेकर, पी.एम. पाटील, व्ही. व्ही.केसरकर यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.एन.पी. गावठे , सूत्रसंचालन प्रशालेची अकरावी कॉमर्सची विद्यार्थीनीं स्नेहल तळेकर ,विराज नांदलस्कर , व आभार मिताली चव्हाण हिने मानले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

five × 2 =