You are currently viewing सावंतवाडीतील कौशल्य विकास केंद्राचे आज उद्घाटन…

सावंतवाडीतील कौशल्य विकास केंद्राचे आज उद्घाटन…

सावंतवाडीतील कौशल्य विकास केंद्राचे आज उद्घाटन…

सावंतवाडी

मोफत प्रशिक्षणा सोबत हमखास नोकरीचीही संधी उपलब्ध करून देणाऱ्या सावंतवाडीच्या “एस.एस.आय या कॉम्प्युटर संस्थेच्या माध्यमातून सुरु करण्यात आलेल्या प्रधानमंत्री कौशल्य विकास केंद्राचा शुभारंभ आज मंगळवार दिनांक ८ मार्चला सायंकाळी ४:०० वा. होणार आहे. यावेळी निवासी तथा अप्पर जिल्हाधिकारी दत्तात्रय भडकवाड यांच्या प्रमुख उपस्थितीत हे उद्घाटन होणार आहे.

यावेळी माणगाव विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक विजयप्रकाश आकेरकर, सांगुळवाडी वैभववाडी महाविद्यालयाचे सचिव संदीप पाटील, शिरोडा येथील वी.स. खांडेकर विद्या प्रतिष्ठानचे सी.जी. ओटवणेकर, सुकळवाड एम.आय.टी.एम काॅलेजचे सूर्यकांत नवले, अण्णासाहेब भोसले आदी प्रमुख पाहुणे उपस्थित राहणार आहेत.

या सेंटरच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना डोमेस्टिक डाटा एंट्री ऑपरेटर, अकाउंट एक्झिक्यूटिव्ह, स्ट्रीट फूड व्हेंडर आदी प्रशिक्षण मोफत दिले जाणार आहे. तर निवडक मुलांना नोकरीची हमी दिली जाणार आहे. त्यामुळे या उद्घाटन समयी सर्वांनी उपस्थित राहावे, असे आवाहन कॉम्प्युटर्सचे संचालक रघुनाथ तानावडे यांच्या माध्यमातून करण्यात आले आहे..

प्रतिक्रिया व्यक्त करा