You are currently viewing झाराप पत्रादेवी मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील ढाबे बनलेत दारूचे अड्डे

झाराप पत्रादेवी मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील ढाबे बनलेत दारूचे अड्डे

 

 

सिंधुदुर्ग जिल्ह्यात दारू, मटका, जुगार म्हणजे कायदेशीर धंदे असल्यासारखेच सुरू झाले आहेत. जिल्ह्यातील बहुतांश भागात जुगाराचे अड्डे, सोशल क्लबच्या नावावर जुगार, दारूचे अवैध व्यापार आणि आता तर गांजा सुद्धा भेटू लागला आहे. जिल्ह्यातून जाणाऱ्या मुंबई-गोवा  राष्टीय महामार्ग वर झाराप पत्रादेवी या काहीश्या कमी वर्दळ असणाऱ्या रस्त्यावर ढाबे सुरू झाले आहेत. या ढाब्यांमधुन जेवण, नाश्ता म्हणता म्हणता दारू सुद्धा पिण्यासाठी परवानगीच नव्हे तर वेगळी जागा उपलब्ध करून देण्यात येत आहे

UP पंजाबी ढाबा नावाने झाराप पत्रादेवी मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर क्षेत्रफळ वाडी येथे हा राजस्थानी ढाबा असून “सरदार” म्हणून व्यक्ती हा ढाबा चालवतो. या राजस्थानी ढाब्यावर दारू पिण्यासाठी देखील जागा उपलब्ध करून दिली जात आहे. या ढाब्यांवर दारू पिणारे तरुण सुद्धा येत असतात. एकीकडे बार चे लायसन्स नसताना दारू पिण्याची परवानगी मिळत नाही तिथे परप्रांतीय लोक येऊन सिंधुदुर्ग जिल्ह्यात ढाबा घालून त्यावर बेकायदेशीर रित्या दारू पिण्यास कसे काय देतात? पोलीस प्रशासन जिल्ह्यातील स्थानिक लोकांवर कारवाई करत असताना परप्रांतीय व्यावसायिकांवर कारवाई का करत नाही? असा प्रश्न स्थानिक ग्रामस्थ विचारत आहेत

सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन जिल्हा झाला आणि जिल्ह्यात असे परप्रांतीय येऊन हायवेवरच ढाबे उघडून दारू व्यवसाय करू लागले तर जिल्ह्याची ओळख पर्यटकांना काय होणार? जिल्ह्यात परप्रांतीय व्यावसायिकांकडून अशाप्रकारे दारू पिण्यास जागा उपलब्ध करून दिली जात असल्याने तरुण, शाळा, कॉलेजचे युवक देखील तिथे चोरून दारू पिण्यासाठी येतात. त्यामुळे तरुणाई चुकीच्या दिशेने वाटचाल करत आहे. जिल्हा अन्न व औषध प्रशासनाकडून अशा ढाब्यांवर कारवाई का केली जात नाही? या ढाब्याचे परवाने असतात का? त्यांचे नूतनीकरण करतात का? ढाब्यांवर नक्की कोणते उद्योग चालतात? याबाबत जिल्हा अन्न व औषध प्रशासन जागरूक आहे का? अवैधरित्या खालसा राजस्थानी ढाब्यावर दारू पिण्यास देत असताना जिल्ह्याचे पोलीस प्रशासन काय करत असते? पोलीस प्रशासन याकडे का डोळेझाक करते? असे प्रश्न स्थानिक ग्रामस्थ विचारत आहेत.

जिल्ह्याचे नाक म्हणजेच जिल्ह्यातून जाणारे महामार्ग. याच महामार्गावर ढाबा नाव लावून परप्रांतीय लोकांकडून होणारे हे गैर धंदे तात्काळ बंद करावेत अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

nineteen − 11 =