You are currently viewing आंबेडकर जयंतीनिमित्त सावंतवाडीत रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

आंबेडकर जयंतीनिमित्त सावंतवाडीत रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

आंबेडकर जयंतीनिमित्त सावंतवाडीत रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

समाजमंदिरात २८ रक्तदात्यांचा सहभाग; तीन महिलांचाही पुढाकार

सावंतवाडी :

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज प्रबोधन समन्वय समिती, सावंतवाडी आणि ऑन कॉल रक्तदाते संस्था, सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने समाजमंदिर, सावंतवाडी येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत तीन महिला रक्तदात्यांसह एकूण २८ जणांनी रक्तदान केले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी ऑन कॉल रक्तदाते संस्थेचे अध्यक्ष तथा सेवानिवृत्त पोलीस उपअधीक्षक दयानंद गवस आणि समाज प्रबोधन समन्वय समितीचे अध्यक्ष जगदीश चव्हाण यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून शिबिराचे उद्घाटन करण्यात आले.
यावेळी व्यासपीठावर रक्तसंक्रमण अधिकारी डॉ. पारवे, उपाध्यक्ष अनिल जाधव, सचिव सगुण जाधव, सहसचिव सदगुरु जाधव, कोषाध्यक्ष केशव जाधव, ऑन कॉल रक्तदाते संस्थेचे निमंत्रित सदस्य दीपक पटेकर, खजिनदार सिद्धार्थ पराडकर, सचिव बाबली गवंडे आदी मान्यवर उपस्थित होते.
प्रसंगी बोलताना दयानंद गवस यांनी, “समाजातील विविध संस्थांनी रक्तदान क्षेत्रात एकत्र येऊन कार्य करावे, या उद्देशाने ऑन कॉल रक्तदाते संस्थेची स्थापना करण्यात आली आहे. समाजसेवेच्या या कार्यात सहभागी होताना आनंद होत असून पुढेही असेच सहकार्य राहील,” असे सांगितले.
अध्यक्षीय भाषणात जगदीश चव्हाण यांनी, “डॉ. आंबेडकर यांच्या प्रेरणेने दरवर्षी रक्तदान शिबिराचे आयोजन केले जाते. ऑन कॉल रक्तदाते संस्थेचे सहकार्य नेहमीच लाभते, याबद्दल आम्ही आभारी आहोत,” असे नमूद केले.
या शिबिरात समीर पार्सेकर, विशाल भगत, ईशा राणे, सुनील जाधव, कांता जाधव, कविता निगुडकर, शांताराम असनकर, गणपत जाधव, परेश जाधव, टिळाजी जाधव, ग्रामसेवक रामचंद्र निगुडकर, जयराम जाधव, नामदेव कदम, सिद्धार्थ जाधव, लुमा जाधव यांच्यासह अनेक कार्यकर्ते व सावंतवाडी रक्तपेढीचे कर्मचारी उपस्थित होते.

नवतरुण रक्तदाता ईशा राणे हिला सन्मानपत्र देताना ऑन कॉल रक्तदाते संस्थेचे अध्यक्ष दयानंद गवस, सोबत इतर मान्यवर

प्रतिक्रिया व्यक्त करा