You are currently viewing मीलन

मीलन

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री राधिका भांडारकर यांची पादाकुलक वृत्तातील अप्रतिम काव्यरचना*

*पादाकुलक वृत्त*
(८+८)

*मीलन*

हळद लागली नवरी नटली
रेशमी शालु सुंदर सजली..

पानी नाजुक कळी उमलते
हळु पाकळी कशी डोलली…

भिजली झाडे भिजली माती
हिरवळ सांगे सृष्टी हसली…

आनंद मनी अती दाटला
एक तुष्टता नयनी दिसली,..

उरात धडधड अधरी स्पंदन
बाहुत त्याच्या अधीन झाली…

राधिका भांडारकर

प्रतिक्रिया व्यक्त करा