You are currently viewing तुझ्या दर्शनाची ओढ मला लागली

तुझ्या दर्शनाची ओढ मला लागली

*संस्थापक अध्यक्ष महाकवी कालिदास प्रतिष्ठान पुणे तथा जागतिक साकव्य विकास मंचचे सन्मा सदस्य ज्येष्ठ लेखक कवी वि ग सातपुते लिखित अप्रतिम काव्यरचना*

*तुझ्या दर्शनाची ओढ मला लागली*
**************************

तुझ्या दर्शनाची ओढ मला लागली
सांग नां रे कोठे तुज पाहू
सांग नां रे कोठे तुज पाहू
विठ्ठला शरण कुणा जावू…|| धृ ||

ताल सुरांचा गंध न मजला
मी गीत कोणते गावू
या नयनांच्या पापणी
किती कसे तुला साठवू…..|| 1 ||

भावप्रीतीचे शुभ्र वस्त्र हे
सांग कसे तुला नेसवू
तव चैतन्याचे दिव्य निरांजन
सांग कसे कुठे रे लावू…….|| 2 ||

अथांग माझी अविचल भक्ती
देवा कशी तुला रे दावू
जीव फुल हे सुकुनी जाता
कुठे कसे तुला रे वाहू…………|| 3 ||

एकच मनीषा पंढरीराया
नयनी तुझ्या रे राहू
घेवूनी जा रे तू भगवंता
मला ऋणी नको रे ठेवू….|| 4 ||

जीवन माझे तृप्त जाहले
सांग रे कृपा किती मागू
दीनदयाळा सोडवी आता
अंत नको रे पाहू……. || 5 ||

तुजवीण कोण सहारा
मी कुठे आसरा रे शोधू
तुच एक रे तारणहारी
अन्य कुणाला शरण जावू… ll6ll

**************************
*©️वि.ग.सातपुते. (भावकवी)*
*आषाढी एकादशी*

_________________________
*संवाद मीडिया*

*सुवर्ण संधी!सुवर्ण संधी!!फिजियोथेरेपी डॉक्टर होण्याची सुवर्ण संधी!!!*

*बॅचलर ऑफ फिजियोथेरेपी(B.P.Th)* करण्याची सुवर्णसंधी.

*Affiliated to MUHS,Nashik,DMER व महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त* कॉलेज मध्ये

*प्रवेश सुरु -शैक्षणिक वर्ष 2026-2027*

*श्री रामराजे कॉलेज ऑफ फिजियोथेरेपी , दापोली.*

*COLLEGE CODE-6191*

*बॅचलर ऑफ फिजियोथेरेपी(B.P.Th)*

*Eligibility- 12th Science (PCB)With NEET and Must Registered with CET Cell can apply.*

*• Duration : 4.5 Years*

*👉मागासवर्गीय विद्यार्थांना शिष्यवृत्ती.(शासन नियमानुसार).*

👉 *सर्व मुलींना 100% ट्युशन फी आणि परीक्षा फी माफी.(शासन नियमानुसार)*

*पत्ता:*

*प्रांत ऑफिस जवळ,दापोली, ता. दापोली, जिल्हा रत्नागिरी, 415712*

*संपर्क:*

*9145623747*
*9420156771*
*7887561247*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/204353/
_________________________
*संवाद मीडिया*
*वेबसाईट* : https://sanwadmedia.com/
*फेसबुक* : https://facebook.com/Snvadmedia
*चॅनेल* :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा