You are currently viewing कुठे गेली आत्या

कुठे गेली आत्या

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्माननीय सदस्य लेखक कवी श्रीनिवास गडकरी लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*कुठे गेली आत्या*

———————————

 

दरवर्षी आत्या माझी

राखीला घरी येई

ताईला आणि मला

प्रेमाने जवळ घेई

 

गोरीपान आत्या माझी

केवड्या सारखी घमघमे

तिच्या केवळ येण्याने

घर सारे आनंदे

 

तांदळाचे लाडू आणि

बकुळीची फुलं

आत्त्यावर खुश असू

आम्ही सारी मुलं

 

आत्त्याच्या गोड गोष्टीत

दिवस दोन संपून जाई

ती गेली तरी तिची

आठवण मात्र येत राही

 

हल्ली आत्त्याचा फोन सुद्धा

कधीच घरी येत नाही

आई बाबा कुणी तिचं

नाव देखील घेत नाही

 

कुठले कारखाने, जमिनी

कुठल्या वाटण्या मोबदले

गेल्या काही वर्ष्यात आमचे

घर मात्र केव्हढे बदलले

 

लाडकी माझी सोनी

कुणी, कुठे, कशी नेली

या साऱ्या गदारोळात

आत्या माझी हरवून गेली

 

श्रीनिवास गडकरी

रोहा पेण पुणे

930861304

केवळ नावासहितच पुढे पाठवावे

@ सर्व हक्क सुरक्षित

 

 

 

*संवाद मिडिया*

 

*🥳दसरा सणाची हिरोची धमाकेदार ऑफर..🏍️*

 

*सविस्तर वाचा👇*

————————————————–

 

*🏍️☘️दसरा सण मोठा – नाही आनंदा तोटा!😇☘️🏍️*

 

👉 *HF DLX* – कॅश डिस्काउंट रुपये 2100💷

 

👉 *DESTINI XTEC* – कॅश डिस्काउंट रुपये 2100💸

 

👉 *XOOM & PLEASURE* – एक्सचेंज बोनस रुपये 3000💷

 

👉 *DESTINI PRIME* – फक्त रु. 87,999 ON ROAD

 

*कमीतकमी डाऊनपेमेंट रुपये 3333/-*

 

*एक्सचेंज सुविधा*

 

*5 वर्षे वॉरंटी आणि हिरोचा विश्वास….*

 

👉 आजच खरेदी करा📝🏍️

 

👉 *नियम अटी लागू*

 

🎴 *मुलराज हिरो एमआयडीसी कुडाळ*

 

*📱9289922336 / 7666212339*

————————————————–

_संवाद मीडिया जगभर घडणाऱ्या घडामोडींचा ताजा व निष्पक्ष वृतांत आपल्यासाठी दिवसभर प्रसारीत करते. साइटवर बातमी प्रसारीत झाल्याबरोबर सूचना मिळवण्यासाठी आमच्या वेबसाइटवर “सूचना (notifications)” ला परवानगी द्या. आम्ही कायम आपल्याला अपडेटेड ठेवू!_

——————————————————-

*वेबसाईट :*

www.sanwadmedia.com

——————————————————-

*फेसबुक पेज :* https://www.facebook.com/snvadmedia

——————————————————-

*इन्स्टाग्राम पेज :*

https://www.instagram.com/sanvadmedia

——————————————————-

*ट्विटर :* https://twitter.com/@mediasanwad

——————————————————

*चॅनेल :* https://www.youtube.com/c/sanvadmedia

——————————————————

📰 *व्हॉट्सऍप* 👇🏻

https://chat.whatsapp.com/BiRiAdzopHTFNHNh3QcKvJ

—————————————————–

*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क : *8356929616*

 

प्रतिक्रिया व्यक्त करा

1 × 2 =