You are currently viewing चांदा ते बांदा योजनेअंतर्गत वेंगुर्ला फळ संशोधन केंद्राला देण्यात आलेली गाडी दापोलीत

चांदा ते बांदा योजनेअंतर्गत वेंगुर्ला फळ संशोधन केंद्राला देण्यात आलेली गाडी दापोलीत

योजना बंद झाली असे सांगत एक संचालक वापरतात गाडी खाजगी ड्रायव्हर घेऊन

महाराष्ट्रात युती सरकारच्या काळात चांदा ते बांदा ही योजना कार्यान्वित करण्यात आली होती आणि या योजनेच्या अध्यक्षपदी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालक मंत्री तथा महाराष्ट्र राज्याचे तत्कालीन गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांच्याकडे होते. दीपक केसरकर यांनी सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यातील अनेक कामांना चांदा ते बांदा या योजनेच्या अंतर्गत मंजुरी दिली होती. चांदा ते बांदा योजनेतून वेंगुर्ला फळ संशोधन केंद्र, वेंगुर्ला याना नवीन महिंद्रा मराज्जो गाडी देण्यात आली होती. परंतु सरकार बदल झाल्यानंतर सरकारने ही योजना बंद करून सिंधुरत्ना नावाने हीच योजना पुन्हा सुरु करणार अशी घोषणा केली. काही काळानंतर दापोली कृषी विज्ञान केंद्राचे संचालक संजय भावे यांनी वेंगुर्ला फळ संशोधन केंद्राला देण्यात आलेली महिंद्रा मराज्जो ही आलिशान कार चांदा ते बांदा योजना बंद झाली असे सांगत दापोली येथे घेऊन गेले असे सूत्रांनी दिलेल्या माहितीवरून समजत आहे. दापोली कृषी विद्यापीठाच्या गाड्या ड्रायव्हरची पदे रिक्त असल्याने कृषी विद्यापीठात उभ्या असतात. वेंगुर्ला फळ संशोधन केंद्राची नेलेली गाडी खाजगी चालक घेऊन आपल्या कुटुंबियांना विविध ठिकाणी जाण्या-येण्यासाठी खाजगी वापरात आणतात अशी माहिती सूत्रांकडून समजते.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला फळ संशोधन केंद्रात केंद्रप्रमुखांना वापरण्यासाठी एकही वाहन नाही. काही दिवसापूर्वी कृषी विद्यापीठाच्या कुलगुरूंचा वेंगुर्ला फळ संशोधन केंद्र दौरा झाला, परंतु कुलगुरू दौर्यावर येत असताना वेंगुर्ला फळ संशोधन केंद्राकडे स्वतःचे वाहन नसल्याने कुलगुरूंच्या दौर्‍यासाठी खासगी वाहन भाड्याने घेण्याची वेळ आली. युती सरकार मध्ये चांदा ते बांदा योजनेचे अध्यक्ष असलेले दीपक केसरकर सावंतवाडी वेंगुर्ला मतदार संघाचे आमदार आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री असताना दीपक केसरकर यांना सरकारी अधिकारी ऐकत नाही अशी ओरड पडलेली होती, आणि वेंगुर्ला फळ संशोधन केंद्राच्या वापरात दिलेली गाडी संचालक हे दापोली येथे नेऊन स्वतः वापरत असून वेंगुर्ला फळ संशोधन केंद्राकडे वाहन नसल्याने दीपक केसरकर यांच्यावर त्यावेळी होत असलेले आरोप खरेच आहेत की काय? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. आमदार दिपक केसरकर यांनी निदान आपल्या मतदार संघातील वेंगुर्ला फळ संशोधन केंद्राची आलिशान महिंद्रा मराझ्झो गाडी पुन्हा वेंगुर्ला फळ संशोधन केंद्रात द्यावी अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

eighteen + ten =