You are currently viewing सिंधुदुर्ग जिल्हा एन.एस.यु.आयच्या वतीने ‘ विद्यार्थी दरबाराचे ‘ आयोजन…

सिंधुदुर्ग जिल्हा एन.एस.यु.आयच्या वतीने ‘ विद्यार्थी दरबाराचे ‘ आयोजन…

सिंधुदुर्ग

कोरानाच्या संकट समयी विद्यार्थ्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. या समयी विद्यार्थींची प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. या बिकट समयी अनेक अडचणी प्रवेश घेताना होत आहे. त्यामुळे पालक व विद्यार्थी हवालदिल झाले आहेत. म्हणून विद्यार्थी यांच्या समस्या जाणण्यासाठी व त्याचे निवारण करण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष  व राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, एन.एस.यु.आय. चे राष्ट्रीय अध्यक्ष निरज कुंदन, महाराष्ट्र प्रभारी अमितकुमार टिमा , महाराष्ट्र राज्य एन.एस.यु.आय.चे. अध्यक्ष अमिर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली ‘विद्यार्थी दरबाराचे‘ आयोजन बुधवार दिनांक ३०/०९/२० रोजी सावंतवाडी काँग्रेस कार्यालय येथे आयोजन केले आहे. कोणत्याही विद्यार्थ्यांला काही समस्या असल्यास विद्यार्थी दरबारात भेट घेण्याचे आवाहन सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्ष कौस्तुभ गावडे यांनी केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

6 − one =