You are currently viewing सावंतवाडी तालुक्यातील कोलगाव कुंभार्ली येथे दशावतारी नाटक

सावंतवाडी तालुक्यातील कोलगाव कुंभार्ली येथे दशावतारी नाटक

दशावतारी नाटकाच्या आडून कोलगावात महाभारत सांगणाऱ्या पवारची जुगाराची मैफिल

सिंधुदुर्ग जिल्ह्यात गावा गावात दशावतारी नाटके जुगारी लोक आयोजित करत असून या दशावतारी नाटकांच्या आडून जुगाराचे फड उभे केले जात आहेत. एकीकडे कोकणची लोककला असलेल्या दशावताराला ऊर्जितावस्था आणण्यासाठी कै.सुधीर कलिंगण सारखे कलाकार झटत होते त्या कोकणच्या लोककलेला गावागावात वाव मिळत असल्याचा आनंद होत असतानाच त्याच कलेच्या आडून दशावतारी नाटक चालते त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर जुगार बसवले जातात हे मात्र नक्कीच निषेधार्ह आहे. गावातील खाकीचे बीट अंमलदार याना हाताशी धरून जुगारी लोक जुगाराचे पट मारण्यासाठी दशावतारी नाटक आयोजित करून लोकांची दिशाभूल करत जुगार बसवून तरुणांना जुगाराचा नाद लावत आहेत. कोलगाव येथे रात्री दहा वाजल्यानंतर दशावतारी नाटक सुरू झाल्यावर महाभारत सांगणारा संजय नवार जुगाराचे मोठ्या प्रमाणात डाव मारत आहे. कणकवली कुडाळ वेंगुर्ला आदी ठिकाणाहून मोठ्या प्रमाणात जुगारी सावंतवाडी तालुक्यातील कोलगाव येथे दाखल झाले आहेत. जिल्ह्यातील जुगारी लोकांना पोलिसांची भीती राहिली नसल्याचेच चित्र समोर येत आहे. त्यामुळे जिल्ह्यात सुरू असलेले जुगार हे नक्की खाकी वर्दीचा आशीर्वादात सुरू आहेत असे चित्र दिसत आहे. जिल्हा पोलीस प्रमुखानी कोलगाव येथे सुरू असलेल्या जुगार बाबत योग्य ती कारवाई करावी अशी मागणी गावातील जागृत नागरिकांनी केली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

fifteen − one =