You are currently viewing अहिल्यादेवी विकास ट्रस्टतर्फे विद्यार्थ्यांना मदत

अहिल्यादेवी विकास ट्रस्टतर्फे विद्यार्थ्यांना मदत

मालवण :

कोरोना महामारीमुळे अतीवृष्टीमुळे दऱ्याखोऱ्यातील गोर गरीब विद्यार्थी यांना अहिल्यादेवी सामाजिक व शैक्षणिक विकास ट्रस्ट कराड व ऑल इंडिया धनगर समाज महासंघाच्या वतीने मालवण तालुक्यातील कुंभारमाठ धनगरवाडा, कातवड धनगर वाडी, देवली धनगरवाडी, असरोंडी धनगरवाडा, कुडाळ तालुक्यातील गोठोस धनगरवाडा, गावराई धनगरवाडा, येथील एकूण 165 विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. ऑल इंडिया धनगर समाज संघ महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष प्रवीण काकडे, नवलराज काळे, कोकण प्रदेश अध्यक्ष अमोल जंगले, जिल्हाध्यक्ष नवनाथ झोरे उपाध्यक्ष बापू वरक, तालुकाध्यक्ष मंगेश झोरे, तालुकाध्यक्ष दीपक खरात आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा